Take a fresh look at your lifestyle.

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ बुधवार, 24 मार्च 2021

मेष : आपले मनोबल वाढणाऱ्या घटना घडतील. आर्थिक उलाढाली मोठय़ा प्रमाणात होतील. आपले चंचल व उतावीळ स्वभावामुळे स्वतःचे नुकसान करुन घेवू नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल.

Advertisement

वृषभ : परदेशातून आलेल्या आप्तस्वकियांकडून विविधप्रकारचे लाभ होतील. आजचा दिवस आपल्या व्यवसायातील कामामुळे आपले कार्यक्षेत्र वाढण्यास अनुकूल आहे. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.

मिथुन : आज आपल्याला मानसिक स्थैर्य लाभेल कुटुंबासाठी काही मौल्यवान वस्तूंची आपण आज खरेदी कराल. मित्र मैत्रिणींचासल्ला घेऊ नका. आपले मनोधैर्य एखादवेळेस खचण्याचा संभव राहतो. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.

Advertisement

कर्क : आज आपण धडाडीने महत्वाचे निर्णय घ्याल. त्या निर्णयांचा फायदा आपले व्यावसायिक कार्यक्षेत्र वाढण्यास होईल. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल.

सिंह : आज आपल्याला आपल्या हाताखालच्या लोकांकडून महत्वाची कामे पूर्ण करून घ्यावी लागतील. आपल्याला मानसिकअस्थैर्य जाणवेल. नोकरी-व्यवसायात जादा कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. नवीन वस्रालंकारांची खरेदी होईल.

Advertisement

कन्या : मित्रपरिवारावर विश्वासाने आपले महत्वाचे काम सोपवू नका. महत्वाची कामे करणे आज टाळावे. नोकरीत एखादीसवलत हवी असल्यास ती मिळण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

तूळ : भागिदारीत व्यवसाय करणार्यांसाठी आजचा दिवस व्यापार वृद्धीस अनुकूल आहे. नोकरीतील आपल्या चांगल्याकामामुळे वरिष्ठ खूष होऊन एखादी सवलत देतील. वैवाहिक सौख्य लाभेल. महिला स्वतःच्या पद्धतीने गृह सजावट करतील.

Advertisement

वृश्चिक : नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल, दगदग होईल. परंतु आज केलेल्या कामाचा आपल्याला भविष्यात निश्चित फायदा होईल. आजचा दिवस भाग्यवृद्धीसाठी अनुकूल आहे. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल.

धनू : शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. उष्णतेचे विकारजाणवतील. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. व्यावसायिक जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडाल.

Advertisement

मकर : आज आपल्या घरी पाहुणे येतील. शैक्षणिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. संततीसौख्य लाभेल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःचे प्रयत्न स्वतःच करावेत.

कुंभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. नोकरीत बढती-बदलीचे योग संभवतात. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.

Advertisement

मीन : आपले महत्वाचे फोन येतील. पूर्वी केलेल्या कामाची पोच मिळेल. आज आपल्या संतती संबंधी सुवार्ता समजेल. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये. कारण नंतर काही वैचित्र्य कळण्याची शक्यता आहे.

Advertisement

Leave a Reply