SpreadIt News | Digital Newspaper

10वी आणि 12वीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, पाहा आता प्रात्यक्षिक परीक्षा किती तारखेला…?

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शिक्षण मंडळातर्फे एप्रिल – मे महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना आतुरता लागली होती की, परीक्षा कधी होणार तर प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचाही या वेळापत्रकात समावेश आहे.

Advertisement

यावेळी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळ सत्रात 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात 3.00 वाजता सुरू होणार आहेत. तुम्हाला 40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांचा तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून दिला जाणार आहे.

10वी-12वीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक

Advertisement

▪️दहावीची लेखी परीक्षा – 29 एप्रिल ते 20 मे

▪️दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा – 21 मे ते 10 जून

Advertisement

▪️बारावीची परीक्षा – 23 एप्रिल ते 21 मे

▪️बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा – 22 मे ते 10 जून

Advertisement

▪️ तसेच, सुधारित वेळापत्रक https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून तुम्ही ते पाहू शकता.

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना –

Advertisement

कोरोना पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या एक ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहा, असं कळविण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चं लेखन साहित्य वापरणं बंधनकारक राहणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement