Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूरच्या तरुणाचं भन्नाट प्रेम; 7 किमी रस्त्यावर ‘तिच्यासाठी’ लिहिले ‘जिंदगी के साथ भी, बाद भी!’

0

प्रेमासाठी वाट्टेल ते…! प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असतं…! अशी वाक्यं फक्त चित्रपटात ऐकायला मिळतात असा आपला समज असतो.

प्रेम लोक लपून-छपून करतात आणि जगासमोर यायला मात्र घाबरतात, असे अनेकदा किस्से आपण पाहिले आहेत.

Advertisement

मात्र, जगजाहीरपणे प्रेम करणारी व्यक्ती खरंच अनोखी असू शकते किंवा त्याची कल्पना जर वेगळी असेल तर नक्कीच असे मुद्दे चर्चेचा विषय ठरतात!

मात्र, फिल्मी वाक्यं काही लोक आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा जगतात. याचे उत्तम उदाहरण सद्यस्थितीला गाजत आहे आणि ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुण!

Advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील धरणगूत्ती गावातील तरुणाने धरणगूत्ती गावापासून जयसिंगपूर या मार्गापर्यंत प्रेयसीसाठी “आय लव्ह यु, आय मिस यु”, “जिंदगी के साथ भी.. और जिंदगी के बाद भी!” असे रस्त्यावर ऑइल पेंटने लिहिले आहे.

गावात येताना आधी 2-3 किमी पासूनच या ओळी वाचायला मिळतात. गाव संपायला अर्धा किमी राहिले असताना या ओळींचा शेवट होतो. अनेक लोक असे वेगळेच प्रेम पाहून अचंबित झाले आहेत.

Advertisement

ही प्रेयसी कोण आणि तो युवक कोण देवच जाणे, मात्र हे असे भन्नाट प्रेम पाहून या ओळी आणि हा प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा प्रकार चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement

Leave a Reply