SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अवघ्या तासाभरातच मिळेल कर्ज, कागदपत्रांचीही झंझट नाही; सरकारने आणली ‘ही’ योजना..

बाजारात ज्याची पत, त्यालाच कर्ज मिळते. त्यामुळे बहुतांशी लोकं खासगी सावकाराकडे वळतात. त्यातून अव्वाच्या सव्वा कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना त्या चक्रव्यूहातून वाचविण्यासाठी प्रयत्न केला आहे.

बँकांनी कर्ज दिलं तरी सतराशे साठ कागदपत्र मागितली जातात आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्याने कर्ज नाकारले जाते. परंतु मोदी सरकारने झटपट कर्ज योजना आणली आहे. ज्या योजनेंतर्गत 59 मिनिटांत कर्ज उपलब्ध होईल. व्यवसाय कर्जे, मुद्रा कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि कार कर्जे अशा प्रकारचे कर्ज मिळू शकते.

Advertisement

ही छोट्या उद्योगपतींसाठी कर्जयोजना आहे. केवळ 59 मिनिटांत 1 लाख ते 5 कोटींपर्यंत कर्ज मिळते. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत या योजनेविषयी माहिती दिली. आतापर्यंत सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. ही योजना प्रारंभिक स्टेजमध्ये आहे.

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 59 मिनिटांत कर्ज देण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केलीय. त्यासाठी सरकारने https://www.psbloansin59minutes.com/home हे पोर्टल त्यासाठी तयार केले आहे. कोणतेही व्यावसायिक या स्किमचा फायदा घेऊ शकतात. व्याजदर 8.50 टक्क्यांपर्यंत आहे. कागदपत्रही फार लागत नाहीत.

Advertisement

10 कोटींपर्यंत गृह कर्जाची सुविधा – गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जेसुद्धा पीएसबी लोनच्या वेबसाईटवर 59 मिनिटांत भेट देऊन उपलब्ध होतील. 10 कोटींपर्यंतचे गृह कर्ज, 20 लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज आणि 1 कोटीपर्यंतचे वाहन कर्जही उपलब्ध होईल.

मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पारदर्शकतेमुळे घोटाळे कमी झाले. 2014 पूर्वी ‘फोन बँकिंग’ होते. आता डिजीटल बँकिंग आहे. वसुलीही वाढली. 2013-14 मध्ये बँकांचा एकूण एनपीए 8.96 लाख कोटी रुपये होता. 5.70 लाख कोटी रुपये झाला.

Advertisement

बँकांची वसुली 2.74 हजार कोटी होती. हा दर 1.01 टक्क्यांवरून 0.23 टक्क्यांवर आला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement