SpreadIt News | Digital Newspaper

‘कुत्ता गोळी’नं तरुणाई पिसाळणार? काय आहे हे प्रकरण सविस्तर वाचा..

0

अंमली पदार्थांची तस्करी हा देशातल्या यंत्रणांसमोर कायमची डोकेदुखी असते. अंमली पदार्थांची तस्करी करणारे वेगवेगळ्या नावाने आणि विविध युक्त्या लढवून आजच्या तरुणाईला आकर्षित करत आहेत. अलीकडेच आढळलेल्या कुत्ता गोळीचे आव्हान यंत्रणांसमोर असल्याची माहीती मिळाली आहे.

पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांना चकवा देण्यासाठी हे ड्रग माफिया वाट्टेल ती शक्कल अकलेने लढवत असतात. आज ना उद्या आपण पोलिसांच्या सापळ्यात अडकणारच हे माहीती असून देखील ते अनेक नावांनी अंमली पदार्थ बाजारात छुप्या पद्धतीने विकतात आणि तरुणांना भुरळ पडते व ते सहज जाळ्यात ओढले जातात.

Advertisement

आता मात्र ‘डॉग टॅबलेट किंवा कुत्ता गोळी’नं यंत्रणांची फारच डोकेदुखी वाढवली आहे. आता तुम्ही म्हणाल ही ‘कुत्ता गोळी’ नेमकं आहे तरी काय.? कधी नावही नाही ऐकलं, आज अचानक कानावर नाव येतंय तर आपण पूर्ण माहिती जाणून घेऊ..

प्राप्त माहितीनुसार, कुत्ता गोळी जेव्हा घेतली जाते, तेव्हा शरीर सुन्न होऊन शारिरीक किंवा मानसिक दुःखाला आपण विसरतो, आपण इतके नशेत असतो की भान राहत नाही. या गोळीतलं केमिकल मेंदूवरच आघात करतं. त्यामुळे झोप येते.

Advertisement

पण असंही कधी कधी होतं की, कुत्ता गोळी घेतल्याने झोप लागत नाही. म्हणून कुत्ता गोळी घेतलेल्या एखाद्या व्यक्तीला झोप जर लागली नाही, तर तो खूप हिंसक होतो. याप्रमाणेच मेंटली ती व्यक्ती डिस्टर्ब होते आणि त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन कायमचं बिघडण्याची शक्यताही जास्त असते. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय ही गोळी घेणं जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळं या गोळीचा वापर हा कधीकधी अपायकारक ठरू शकतो.

अधिक बारकाईने बोलायचं झालं, तर कुत्ता गोळी वेगवेगळ्या पॉवर कपॅसिटीमध्ये येते. या गोळीची तस्करी करण्यासाठी ड्रग माफियांनी त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. डॉबरमॅन, बुलडॉग, जर्मन शेफर्ड अशा एकेक इतर टोपण नावांनीही या गोळ्या ओळखल्या जातात. तसंच क्वांटिटीसाठीही वेगवेगळी सांकेतिक नावं देण्यात येतात व विक्रीही या नावांनीच हुशारीने अधिक सोईस्कर बनविली जाते.

Advertisement

कुत्ता गोळीची किंमत किती आहे?

कुत्ता गोळी जेव्हा सुरूवातीला आली होती तेव्हा या गोळीची किंमत फारच कमी ठेवण्यात आली. आधी 10 गोळ्यांची स्ट्रीप म्हणजेच पाकीट 20 रुपयांना मिळायचे. मात्र तरुणाईला आकर्षित करून एकदा जाळ्यात ओढल्यानंतर आता 150 ते 200 रुपयांपर्यंत स्ट्रीप विकली जात आहे. सर्वात जास्त नुकसान म्हणजे कुत्ता गोळीमुळे तरुणाई पिसाळण्याचा धोका आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी आता वेळीच या कुत्र्याला साखळीत अडकवायला हवं, म्हणजे बरं !

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement