SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अतिरेक्याचा मुलगा म्हणाला, ‘पापा लौट आवो’.. तरीही तो लपून राहिला आणि अघटित घडले! वाचा एका अतिरेक्याची ‘कहाणी’

भारताचे नंदनवन म्हणून जम्मू-काश्मीरकडं पाहिलं जाते. मात्र, दहशतवाद्यांमुळे या नंदनवनात रक्ताचा सडा शिंपडला जातोय. गेल्या काही दिवसांपासून तेथील कारवायांना पायबंद बसला आहे. तरीही स्थानिक तरूणांची माथी भडकावून दहशतवादी आपला नापाक उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काश्मिरी तरूण अतिरेक्यांच्या आमिषाला बळी पडून यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांना यशही आलंय. कालची घटना ह्रदय पिळवटून टाकणारी होती. अतिरेक्यांच्या नादाला लागून एक स्थानिक त्यांच्या गोटात गेला होता.

Advertisement

त्याला काश्मीर खोऱ्यात घातपात घडवायचा होता. त्याच्या या हरकतीची सैनिकांना कुणकुण लागली. त्यांनी त्या तरूणाचा पिच्छा पुरवला. परंतु तो बेपत्ता झाला होता. शोपिया भागात लपून बसल्याचे कळताच आपले सैनिक तेथे गेले. त्याच्यासोबत काही दहशतवादीही होते.

शोपिया भागात दडून बसलेल्या त्या अड्ड्यावर सैनिकांनी धडक मारली. त्यांना गोडीगुलाबीने शरण येण्यास सांगितले. परंतु ते बाहेर येण्यास तयार नव्हते. वारंवार विनंती करूनही ते सरेंडर होत नव्हते. सैनिकांनी शक्कल लढवली.

Advertisement

तीन दहशतवाद्यांनी स्थानिक तरूणाला भडकवले होते. त्याच्या पत्नीला घेऊन आले. तिच्यासोबत चारवर्षांचा मुलगाही आला. त्या बिचाऱ्या पत्नीने दडून बसलेल्या पतीला प्रेमाने हाक दिली.

पोलिसांना तुम्ही शरण या. बाहेर या नाही तर मलाच गोळी घालून मारून टाका, अशा प्रकारे तिचा भावनिक टाहो सुरू होता. परंतु त्याने एक ऐकली नाही.

Advertisement

आईनंतर त्या अतिरेक्याचा मुलगा रडू लागला. आपल्या वडिलांना बोलावू लागला. “पप्पा तुमची मला फार आठवण येतेय, हे पोलिस तुम्हाला काहीही करणार नाहीत. खरंच मी तुमचा मुलगा उफानराजा बोलतोय….” त्याची ही भावनिक साद तेथील सर्वांनाच हेलावून गेली. आतील बापाचे ह्रदयही हेलावून गेलं असणार. बराच वेळ झाला.

परंतु, आतून काही प्रतिसाद आला नाही. शेवटी पोलिसांनी पुन्हा हाक दिली. परंतु आतून काहीच आवाज आला नाही. पोलिसांनी नाईलाजाने गोळीबार केला. त्यातच तो तरूण अतिरेक्यांसह गतप्राण झाला.

Advertisement

का फुटला नाही त्याच्या ह्रदयाला पाझर? मुलाची आर्त हाक ऐकून, तो दहशतवाद्यांच्या नादाला लागलेला तरूण बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु त्याच्यासोबत इतर तिघेजण दडले होते.

त्यांनी त्याला अडवलं. त्यामुळे बाप-लेकांची भेट होऊ शकली नाही. लेकाच्या हाकेलाही तो ‘ओ’ देऊ शकला नाही. त्या अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्या माय-लेकाची अवस्था न पाहण्यासारखी होती. पोलिसांना नाईलाजाने ही कारवाई करावी लागली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement