सरकारने भविष्य निर्वाह निधीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. पीएफ खात्यात 5 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त करण्यात आली आहे, अशी माहीती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे.
1 फेब्रुवारी 2021 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करत म्हटलं होतं की, “पीएफ खात्यातील अडीच लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त राहील. त्यापलीकडे पैसे जमा केल्यास अतिरिक्त रकमेवरील व्याज करपात्र असणार आहे.”
परंतु आता ही मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. म्हणजेच जर आपण एका वर्षात 5 पीएफ खात्यात 5 लाखांपर्यंत रक्कम जमा केली तर व्याज हे पूर्णपणे करमुक्त राहील. हा नियम 1 एप्रिलपासून लगेच लागू होईल. सेवानिवृत्ती निधीमध्ये मालकाचे कोणतेही योगदान नसल्यास हा नियम लागू होईल.
लोकसभेत मंगळवारी वित्त विधेयक मंजूर झाले. लोकसभेत या विधेयकावर चर्चा होत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पीएफ मर्यादा अडीच लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.
वित्त विधेयकाला लोकसभेत मान्यता मिळाल्यानंतर अर्थसंकल्पाच्या घोषणेस 1 फेब्रुवारी रोजी मान्यता देण्यात आली होती, तर 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला तेव्हा ‘ पीएफ व्याज करपात्र करण्याच्या परिणामाचा केवळ 1 टक्का फायदा होईल’, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावर सरकार चर्चेसाठी तयार –
लोकसभेत काल परत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी झाली. तर वित्त विधेयक मांडताना विरोधी पक्षनेत्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा मुद्दा उपस्थित केला.
त्यांना पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याविषयी प्रश्न विचारला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, ‘सरकार पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे.’
निर्मला सीतारामण म्हणाल्या की, “पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र व राज्य सरकार असे दोन्ही सरकार कर लावतात. मग जर पेट्रोल आणि डिझेलवर लावल्या जाणाऱ्या कराबाबत समस्या असेल, तर सरकार ते काही दिवसांतच जीएसटीच्या कक्षेत आणणार आहे. जेव्हा जीएसटी परिषदेची पुढील बैठक होईल, तेव्हा राज्यांसोबत चर्चा करून त्यांच्या मदतीने या विषयाला अजेंड्यात समाविष्ट केले जाणार आहे आणि त्यानंतर त्यावर गंभीर स्वरूपाची चर्चा होईल”, अशी अपेक्षा आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit