Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो ! तुमच्यासाठी लावा कंपनीने लाँच केले ‘मेड इन इंडिया’ टॅबलेट्स, किंमत फक्त ‘इतकी’ रुपये..

0

जबरदस्त स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक भारतीय स्मार्टफोन कंपनी Lava ने भारतात आपले तीन नवीन टॅबलेट्स लाँच केले आहेत.

लावा कंपनीने विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी कमी किंमतीत शानदार वैशिष्ट्ये असलेले 3 टॅबलेट्स विद्यार्थ्यांसाठी आणले आहेत. या शानदार तिन्ही टॅबलेट्समध्ये तुम्हाला मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी आणि उत्तम साउंड क्वालिटी मिळेल, असा कंपनीने दावा केला आहे.

Advertisement

भारतात गरजेनुसार म्हणा किंवा कोरोनाच्या काळात घरी बसून शिक्षणाचा उपाय म्हणा यामुळे ई-लर्निंग आणि ऑनलाईन क्लासेसचं प्रमाण वाढत असल्याचं बघून विद्यार्थ्यांसाठी हे तीन टॅबलेट्स लावाने लाँच केले आहेत.

लावा मॅग्नम एक्सएल (Lava Magnum XL), लावा ऑरा (Lava Aura ) आणि लावा आइवरी(Lava Ivory) हे तीन टॅबलेट कंपनीने आणले असून तिन्ही टॅबलेटची किंमत अनुक्रमे 15 हजार 499 रुपये, 12 हजार 999 रुपये आणि 9 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. फक्त ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरुनच हे तिन्ही टॅबलेट खरेदी करता येणार आहे.

Advertisement

टॅबलेट्सचे स्पेसिफिकेशन्स –

लावा मॅग्नम एक्सएलमध्ये (Lava Magnum XL) 10.1 इंचाची मोठी स्क्रीन, 6100 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी, स्क्रीनमध्ये 390 निट्स ब्राइटनेससोबत आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. या टॅबलेटमध्ये 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, MediaTek 2GHz क्वॉड कोअर प्रोसेसर, 32 जीबी स्टोरेज असून मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

Advertisement

लावा ऑरामध्ये (Lava Aura) 8 इंचाची स्क्रीन आणि 5100 एमएएच क्षमतेची बॅटरी, 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा व 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये देखील कंपनीने मीडियाटेक 2 गीगाहॉर्ट्ज क्वॉड कोअर प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे.

लावा आइवरीमध्ये (Lava Ivory) 7 इंचाची स्क्रीन साइज असून यात 16 जीबी स्टोरेज आहे. तीन टॅबलेटपैकी हा लावाचा सर्वात स्वस्त टॅबलेट आहे. यात 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही दिला गेला आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement

Leave a Reply