SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

अँटिलिया आणि मनसुख हत्या केस कनेक्शन

▪️ दोन्ही प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेले सिमकार्ड एकाच फॅक्ट्रीतील कर्मचाऱ्यांच्या नावावर, गुजरातमधून एकास अटक

Advertisement

▪️ अँटिलिया प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथका (ATS)कडून दमणमधून एक व्होल्वो कार जप्त, मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय

अँटिलिया केस प्रकरणाला वळण

Advertisement

▪️ NIA टीमला सचिन वाझेंच्या सिक्रेट डायरीमध्ये आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले, धमकी देण्यात आलेल्या पत्राचे प्रिंटरही जप्त

▪️ अँटिलिया स्फोट केसचा तपास करत असलेल्या NIA टीमला सचिन वाझेंकडून एक सिक्रेट डायरी मिळाली, ही डायरी वाझे यांनी CIU ऑफिसमध्ये लपवून ठेवली होती, वाझे आपल्या सिक्रेट गोष्टींचा ऑनलाईन रेकॉर्ड ठेवत नव्हते, या डायरीमध्ये आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. यातील जास्त व्यवहार हे कॅश ट्रान्स्फरचे आहेत.

Advertisement

मध्यप्रदेशात भीषण अपघाततात 13 जणांचा मृत्यू

▪️ ग्वाल्हेरमध्ये बस-ऑटोच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, यामध्ये 12 महिला, अंगणवाडीत स्वयंपाक करण्यासाठी निघाल्या होत्या

Advertisement

▪️ मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ऑटो आणि बसची समोरासमोर धडक, 13 जणांचा मृत्यू, ऑटो ड्रायवर आणि 12 महिलांचा मृत्यू, सर्व महिला अंगणवाडीत मुलासांसाठी जेवण बनवण्यासाठी जात होत्या, 9 महिला आणि ऑटो ड्रायवरचा जागेवरच मृत्यू झाला तर 3 महिला रुग्णालयात मृत

अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू

Advertisement

▪️ अमेरिकेतील कोलोराडो प्रांतातील एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याची भयंकर घटना समोर, 10 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू

▪️ मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश, पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं, मात्र याबाबत अधिक माहिती नाही

Advertisement

फ्रान्सपाठोपाठ जर्मनीतही लॉकडाऊन

▪️ पाच दिवसांपैकी एक दिवसच उघडली जाणार अन्नधान्य आणि भाज्यांची दुकानं, चान्सलर अँगेला मर्केल यांनी केली घोषणा

Advertisement

▪️ चान्सलर अँगेला मर्केल यांची देशभरातील वेगवेगळ्या प्रांतामधील 16 नेत्यांसोबत कोरोना आढावा बैठक, बैठकीत सर्वच नेत्यांनी 1 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान देशात लॉकडाउन लागू करण्यासंदर्भात सहमती दर्शविली, निर्णय सर्वानुमते संमत, पाच दिवसांच्या या लॉकडाउनदरम्यान देशातील जवळजवळ सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement