SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

26 मार्चला स्वस्तात मिळणार घर आणि दुकान; जाणून घ्या कॅनरा बँकेची योजना!

तुम्ही फ्लॅट, घर किंवा दुकान घेण्याच्या विचारात असाल आणि ते स्वस्तात मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर 26 मार्च हा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे हे कोणते भविष्य किंवा ज्योतिषशास्त्र नाही तर कॅनरा बँकेकडून तुम्हाला हा मोठा धमाका मिळणार आहे.

ट्विटरवर बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी मेगा ई-लिलाव होणार आहे. पहिल्या टप्प्यातील लिलाव 16 मार्च रोजी झाला आहे. ज्यामध्ये फ्लॅट्स, अपार्टमेंटस् , निवासी गृह कार्यालय, औद्योगिक जमीन, इमारत आणि रिक्त जागा समाविष्ट आहे. डिफॉल्टरकडून पुनर्प्राप्तीसाठी तारण मालमत्तेचा लिलाव सतत बँकांकडून केला जात आहे.

Advertisement

भारतभरातील लोकांकडून तारण ठेवण्यात आलेली संपत्ती विकण्यासाठी हा लिलाव कॅनरा बँकेने ठेवला आहे. यातून तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्या स्वप्नातले फ्लॅट, घर, किंवा दुकानासाठी जागा खरेदी करू शकता.

त्यामुळे तुम्ही घर, फ्लॅट किंवा दुकान साठी जागा घेण्याच्या विचारात असाल तर, 26 मार्चच्या आधी लिलावात भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. केवायसी बँकेच्या पूर्ण तपशिलासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रे कॅनरा बँकेच्या शाखेत जमा करावी लागतील.

Advertisement

💁🏻‍♂️ लिलावाविषयी अधिक माहितीसाठी ही वेबसाईट तपासा

ट्विटर हँडलवर बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या मालमत्तेबद्दल माहितीसाठी कॅनरा बँकेच्या कॉर्पोरेट वेबसाइट https://canarabank.com वर भेट देऊन पहा. ग्राहक कॉर्पोरेट वेबसाइट https://canarabank.com> निविदा> विक्री सूचना आणि लिलाव सेवा भागीदाराशी संपर्क साधू शकतात.

Advertisement