शिवसेना व महाविकास आघाडीवर तुटून पडणारी, भाजपच्या हातातील कळसुत्री बाहुली, बडबडी, कोणासोबतही पंगा घेणारी…एव्हाना तुम्ही तिला ओळखलं असेलच..हां तीच ती कंगणा..!
आता तिची ही ओळख झाली असली तरी ती वैयक्तिक आयुष्यातही विचारांनी आणि दिसण्यातही बोल्ड आहे. तिचं कर्तृत्व स्वतः घडवलं आहे, कोणाच्याही मदतीशिवाय. म्हणून तिला मानणारा मोठा वर्ग आहे. जो तिला कोणत्याही चुकीसाठी माफ करून तिचे सिनेमे पाहतो.
आतापर्यंत तिला चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. तिने आपल्या आई-बाबांविषयीच खळबळजनक विधान केलं आहे.
तिचा जन्म हिमाचल प्रदेशातील. 23 मार्च 1987 ही तिची जन्मतारीख. तिला डॉक्टर व्हायचं होतं. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते; परंतु ती झाली बॉलीवूडची क्विन.
कंगनाच्या आधी भावाचा जन्म झाला होता. मात्र, जन्माच्या अवघ्या दहा दिवसांतच तो हे जग सोडून गेला. अर्थातच तिच्या आई-वडिलांना मुलगा झाला पाहिजे, अशी अपेक्षा होती. मी आई वडिलांना नकोशी होते, असं तिने एका मुलाखतीत सांगितलंय.
2006 मध्ये ती ‘गँगस्टर’मध्ये दिसली. खरोखरच तिचा हा एकदम जबरदस्त सिनेमा होता. ‘वो लम्हें’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘फॅशन’, ‘राज’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ आदी चित्रपट तिच्या नावावर आहेत. ‘मणिकर्णिका फिल्म्स’ ही स्वतःची कंपनीही काढली आहे. त्यातून ती चित्रपट बनवते आहे. तिने खरेतर मॉडेल म्हणून चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले. आता तिला बॉलीवूडची क्विन म्हटलं जातं. परंतु ही क्विन एकेकाळी आई-बाबांसाठी नकोशी झाली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit