देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) कंपनीचे तुम्ही ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची असणार आहे. जर तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल तर आपण आपल्या पॉलिसीवर कर्ज काढू शकता.
तुम्ही व्याजासह कर्जाची परतफेड करू शकता किंवा व्याज भरणे चालू ठेवू शकता व दाव्याची रक्कम मिळण्याच्या वेळेस कर्जाची रक्कम कापून घेतली जाऊ शकते. आधीचे कर्ज फेडून झाल्यावर पॉलिसीवर आणखी कर्ज ही मिळू शकते.
समजा तुमची एलआयसी पॉलिसी परिपक्व झाली अथवा तुम्हाला पॉलिसीवर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी एनईएफटी मॅनडेट फॉर्म भरावा लागणार आहे. जर आपण हा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला पॉलिसी मॅच्युरिटीचे पैसे मिळणार नाहीत. आता सांगायचंच झालं तर एलआयसीने चेकद्वारे पैसे देणे बंद केले आहे. मग आता विमा कंपनी आता थेट पॉलिसीधारकांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करते.
भारतात सर्वात मोठं जाळं असणारी विमा कंपनी एलआयसीच्या मते, कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना एकदम योग्य आणि खात्रीशीर, सुरक्षित पेमेंट केले जाऊ शकते. सर्व डिजिटल देयके कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता करता येत आहेत. या विनामूल्य ई-सेवांसाठी एलआयसीचे ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
पॉलिसीसह लिंक करा आपलं बँक खातं..
▪️ आपल्या जवळच्या एलआयसी कार्यालयात जा आणि एनईएफटी मॅनडेट फॉर्म भरा.
▪️ या फॉर्मसोबत तुम्ही कॅन्सलेशन चेक किंवा बँक पासबुकची एक प्रत संलग्न करा आणि ती सबमिट करा.
▪️ एका आठवड्यानंतर पॉलिसी बँक खात्याशी लिंक होईल. यानंतर, एलआयसीकडून मिळालेले कोणतेही पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येतील.
‘एलआयसी’ या विमा कंपनीकडे देशभरात 113 विभागीय कार्यालये, 2,048 शाखा, 1,526 छोटी कार्यालये आहेत. याशिवाय यामध्ये 74 ग्राहक झोन आहेत जिथे त्यांच्या पॉलिसीचे मॅच्युरिटी क्लेम फॉर्म पॉलिसीधारकांकडून स्वीकारले जातील. यामध्ये कोणत्याही शाखेतून घेतलेल्या पॉलिसीवर दावा सांगण्याचा फॉर्म कोठेही सादर केला जाऊ शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit