SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ती सहल भोवली! म्हणून.. वाढले नगर मध्ये कोरोनाचे रुग्ण!

नगर: कोरोना आता गुणाकाराला लागला आहे. तरीही कोणी ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही. नगर शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. आता समूह संसर्ग वगैरे होत असला तरी त्याचे कोणाला काही देणे घेणे नाही. कोणाला आता कोरोनाची भीती नसल्याने संसर्ग वाढतो आहे.

नगर शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाने आता नवीन वानवळा आला आहे. त्याच्या वाढदिवसामुळे तब्बल दीडशेजण बाधित झाले आहेत. आपल्या वाढदिवसामुळे त्याने मित्रमंडळी, आप्तेष्टांची सहल घडवून आणली. या सहलीनेच घात केला आहे. वैष्णवदेवी, जम्मू, काश्मीर, अमृतसर भागात देवदर्शन करवून आणले.

Advertisement

तब्बल पावणे दोनशेजणांची ही सहल होती. रेल्वेने ही सहल काढण्यात आली. यात सहलीत शेवगाव, नगर शहर, श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यातील लोक सहभागी झाले होते.

सहलीत असताना काहीजणांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते माघारी आले. त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा वानोळा जिल्ह्यात आला आहे.

Advertisement

😱 आकडा सातशेच्या जवळ :
आजही काेराेनाबाधितांचा आकडा सातशेच्या जवळ पाेहाेचला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 692 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 220 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयानुसार 168, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 361 आणि रॅपिड चाचणीमध्ये 163 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

📌 तालुकानिहाय बाधित

Advertisement

अहमदनगर शहर 220
राहाता 75
संगमनेर 66
श्रीरामपूर 55

नेवासे 48
नगर तालुका 47
पाथर्डी 35
अकाेले 28

Advertisement

काेपरगाव 28
कर्जत 18
पारनेर 16
राहुरी 14

भिंगार शहर 11
शेवगाव 10
जामखेड 06
श्रीगाेंदे 06
इतर जिल्ह्यातील 09

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📰 ताज्या बातम्यांसाठी ‘स्प्रेडइट’ जॉईन करा 👉 www.spreadit.in

Advertisement