SpreadIt News | Digital Newspaper

विक्रमी खेळीनंतर कृणाल रडला हार्दीकला मिठीत घेऊन!

0

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलीच मॅच खेळणाऱ्या कृणाल पांड्या ने धमाकेदार बॅटिंग करत विक्रमी खेळी केली. या खेळीनंतर कृणाल पांड्या याने आपल्या भावना भाऊ हार्दिक पांड्या च्या मिठीत व्यक्त केल्या. हार्दिक ला मिठी मारल्यानंतर कुणाला अश्रू अनावर झाले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलेच मॅच खेळत असताना कृणाल पांड्या ने अशी कोणती कामगिरी केली ज्यामुळे हार्दिक आणि कृणाल दोघेही भावनिक झाले? चला तर जाणून घेऊया 31 बॉल मध्ये नाबाद 58 धावा केल्या. यामध्ये सात चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. केवळ 26 बॉलमध्ये कृणाल ने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पहिल्याच वनडे मध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम कृणाल पांड्या च्या नावावर झाला.

Advertisement

हा विक्रम होताच आज हार्दिक पांड्या ला मिठी मारून तो ढसाढसा रडायला लागला. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या वडिलांचे निधन झाले आहे. आणि वडिलांच्या आठवणीने कृणाल ला अश्रू अनावर झाले.

कृणाल या आधी भारताकडून t-20 क्रिकेट खेळला आहे. मात्र, भारताकडून त्याची पहिलीच वन डे मॅच होती. विजय हजारे ट्रॉफी मध्ये कृणाल आणि प्रसिद्ध या दोघांनी देखील शानदार कामगिरी केली आणि त्यामुळे त्यांची वन-डेमध्ये निवड झाली आहे.

Advertisement

मॅच आधी कृणाल याला छोट्या भावाने म्हणजेच हार्दिक ने वन डे कॅप दिली. आणि त्याच्याकडून ती घेताना देखील कृणाल भावूक झालेला पाहायला मिळाला.

Advertisement