SpreadIt News | Digital Newspaper

📝 अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार ? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतेय…

0

👮🏻 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे.

🗣️ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर पक्षाची भूमिका मांडताना म्हटलं की…

Advertisement

🧐 “अनिल देशमुख हे सचिन वाझेंना फेब्रुवारीच्या शेवटी भेटले असं परमबीर सिंह सांगत आहेत; परंतु अनिल देशमुख फेब्रुवारीच्या सुरुवातीला जनसंवाद यात्रेत होते. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे 15 तारखेपर्यंत रुग्णालयात होते. त्यानंतर 27 तारखेपर्यंत क्वारंटाईन असताना कोणाला भेटले नाहीत”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक म्हणाले.

🤨 ‘या राज्याने अनेक मुख्यमंत्र्यांना छोट्या चुकांसाठी घरी पाठवलं आहे’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “कालपर्यंत मोठी चूक वाटत होती आणि आता छोटी चूक म्हणत आहे, म्हणजे कुठेतरी भाजपाला यामध्ये काही तथ्य निघणार नाही असं दिसत आहे. शरद पवारांनी काहीतरी शिजल्यानंतर हे आरोप होत असल्याचं सांगितलं आहे.”

Advertisement

🔎 पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “यासंबंधी तपास होणं गरजेचं आहे. तपास होऊ द्या, जे सत्य आहे त्यापद्धतीने पुढील कारवाई होईल. आरोपांमध्ये सत्य किती आहे याची माहिती घेतल्याशिवाय राजीनामा द्या अशी मागणी करणं सोपं आहे. बिनबुडाचे आरोप कोणीही करु शकतो. सध्या राजीनामा घेण्याची गरज नाही अशी स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. पत्राबाबत शंका असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही”, असे मलिक म्हणाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement