Take a fresh look at your lifestyle.

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ सोमवार, 22 मार्च 2021

मेष – आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. कामातून आनंद मिळेल. सहकार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

Advertisement

वृषभ – जुगाराची हौस पूर्ण कराल. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल. नाटक वा सिनेमा पाहण्याचे ठरवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

मिथुन – घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी. आततायीपणा करून चालणार नाही.

Advertisement

कर्क – जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सानिध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल. एककल्ली विचार करू नका.

सिंह – मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. भागीदारीत नवीन विचार मांडाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. नातेवाईकांची नाराजी दूर करावी.

Advertisement

कन्या – दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. उत्तम गृहसौख्य लाभेल.

तूळ – आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्वबाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल. वैवाहिक सौख्याच्या बाबीत समाधानी राहाल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

Advertisement

वृश्चिक – संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत. कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्या. नोकरांचे सुख मिळेल.

धनू – योग्य तर्काचा वापर कराल. आपले बौद्धिक ज्ञान उत्तमरीत्या वापराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकवार चिंतन करावे.

Advertisement

मकर – सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.

कुंभ – आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी. नवीन मित्र जोडावेत. तुमच्या हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

Advertisement

मीन – कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल. कामातील क्षुल्लक अडथळे दूर करावेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement

Leave a Reply