SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

😱 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी..?

▪️ मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे अटक, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप यामुळे वातावरण चिघळलं

Advertisement

▪️ या सर्व घटनांमुळं विरोधकांची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे”, शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारलं

💥 अँटिलिया प्रकरण: आणखी काही जणांना अटक ?

Advertisement

▪️ सचिन वाझेंनी स्फोटकांच्या कटात मनसुख यांचाही होता समावेश, रहस्य समोर येण्याच्या भीतीने त्यांची हत्या केली, ATS ला संशय

▪️ तपासात उघड: मनसुख यांची पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरून तपास, मनसुख हिरेनची हत्या झाली तेव्हा सचिन वाझे घटनास्थळी नव्हते, या हत्येत अजुन काही लोकांचा सहभाग असल्याचा पुरावा एटीएसला सापडला, त्यातील काही पोलिस असण्याची शक्यता

Advertisement

🔫 जम्मू-कश्मीरमध्ये एन्काउंटर; लष्कर-ए-तोयबा कनेक्शन !

​​​​​​▪️ शोपियामध्ये सुरक्षा दलाने 4 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान; अजून 2 दहशतवादी लपल्याचा अंदाज, शोधकार्य सुरू; जम्मू-कश्मीरमधील शोपियामध्ये सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची मिळाली होती प्राथमिक माहिती

Advertisement

▪️ रविवारी झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार झालेला जहांगीर हा दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’सोबत जुडलेला, तो शोपियामधील राख नारापोरा येथील रहिवाशी, गेल्या सप्टेंबरपासून दहशतवादी संघटनासोबत होता सक्रीय

😷 पुण्यात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

Advertisement

▪️ खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा घेतला निर्णय, राज्यात पुणे जिल्ह्यात दररोज 3 हजारांहून अधिक रुग्ण आढळत असल्यानं प्रशासन सतर्क

▪️ ‘दररोज 15 हजार चाचण्या आणि 20 हजार लसीकरण करून कोरोना विरोधात प्रशासन लढण्यास सज्ज, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहीती

Advertisement

💐 कोल्हापूर: ज्येष्ठ शाहीर कुंतीनाथ करके यांचं निधन

▪️ ज्येष्ठ शाहीर कुंतीनाथ करके (वय 85) यांचं रविवारी मध्यरात्री हृदविकाराच्या झटक्यानं निधन

Advertisement

▪️ हातकणंगले तालुक्यातील हेरले गावी घेतला अखेरचा श्वास, सोंगाड्या, अन्याय, प्रतिकार, गंगू बाजारला जाते, अशा अनेक चित्रपटांत लिहिली होती गाणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement