SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सगळ्यांना प्रिय असणारं सोनं खरं आहे कि खोटं? ओळखण्यासाठी काही खास टिप्स..

सोने खरेदी करणे हे गुंतवणुकीचे उत्तम साधन म्हणून ओळखली जाणारी क्रिया आहे. सोने खरेदी करताना ते खरे आहे की खोटे आहे याबाबत अनेकदा ग्राहकांच्या मनात साशंकता असते उत्तमरित्या पडताळणी करूनच सोने खरेदी करणे आपल्या गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य ठरते. आज आपण जाणून घेणार आहोत काही सोप्या पद्धती, ज्या तुम्हाला अगदी सहजपणे सोने खरे आहे की खोटे याची माहिती देतील.

हॉलमार्क: सोन्याची कोणतीही गोष्ट खरेदी केल्यानंतर त्यावर असणारा हॉल मार्क त्याच्या शुद्धतेची खात्री पटवून देतो. सर्टिफिकेशन ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड हॉलमार्क चे सर्टिफिकेशन देतात. याद्वारे आपल्याला विविध ब्रँडचे सोने हॉलमार्क सहित पाहायला मिळते. मात्र, लोकल विक्री करणारे सोनार हॉलमार्क शिवाय सोने विकतात ज्याची पडताळणी करणे थोडे अवघड जाते.

Advertisement

फ्लोटिंग टेस्ट: सोन्याची फ्लोटिंग टेस्ट म्हणजे सोने बुडते की नाही, हे तपासणे सोने पडताळणी करताना उपयुक्त ठरते. बादलीभर पाणी घेऊन त्यात सोने टाकले आणि ते जर बुडले तर ते खरे सोने आहे असे समजावे. कारण, सोने हा कठोर धातु असतो. जर तो तरंगला तर समजा की तो बनावट आहे.

व्हिनेगर टेस्ट: आपल्या स्वयंपाक घरात असणारे व्हिनेगर देखील आपल्याला सोने खरे आहे की खोटे हे दाखवून देऊ शकते. सोन्याच्या दागिन्यांवर थोडेसे व्हिनेगर टाकले आणि त्याचा रंग बदलला तर ते बनावट आहे असे समजावे. जर रंग बदलला नाही तर, सोने खरे आहे याची खात्री बाळगावी.

Advertisement

ऍसिड टेस्ट: सोन्याच्या दागिन्यांवर नायट्रिक ऍसिड कोणताही परिणाम करत नाही. मात्र सोने बनावट असेल तर त्यामध्ये बदल जाणवून येईल. सोप्या पद्धतीने ही टेस्ट केली जाऊ शकते. मात्र, ॲसिड असल्याने स्वतःची काळजी घेत सोने पडताळणी करताना ही टेस्ट करावी.

चुंबक: चुंबकाचे तपासणी करणे हे अत्यंत सोप्या पद्धतीने सोन्याची पडताळणी करण्यासारखे आहे. सोने हा धातू कधीही चुंबकाकडे आकर्षित होत नाही. त्याला कधी गंज चढत नाही. त्यामुळे सोन्यावर गंज चढलेला दिसला किंवा चुंबकाकडे आकर्षित झाले तर ते सोने खरे आहे असे समजू नये. ते बनावट सोने आपल्याला दिले गेले आहे याची खात्री बाळगावी.

Advertisement

🎯 इतर महत्वपूर्ण बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: www.spreaditnews.com

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement