SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला आधारकार्ड वरचा फोटो बदलायचा आहे? मग वापरा ‘ही’ सोपी पद्धत..

तुमचा आधार कार्डवरचा फोटो तु्म्हाला आवडत असेल असे खूप लोक असतील. काहींना तर आधार कार्डची झेरॉक्स कॉपी कोणाला द्यायलाही ‘आपण काय दिसत आहोत’ म्हणून कोणी कंटाळाही करतं.

बर चला तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, आता तुमच्या मागची ही कटकट आता संपली म्हणून समजा..

Advertisement

ते कसं..? तर आधार कार्ड वरील तुम्हाला तुमचा फोटो विचित्र वाटत असेल तर तो तुम्ही आता बदलू शकता. होय ! तोही एकदम फटाफट काही वेळेतच बदलू शकता. आधार कार्डवरील तो फोटो तुम्हाला बदलायचा आहे का? किंवा तसा विचार तुम्ही करत असाल तर कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन तुम्हाला तासंतास उभं राहण्याची गरज नाही.

आधारकार्डवरील फोटो बदलवण्यासाठी नेमकं काय करावं आणि खर्च किती लागेल जाणून घ्या थोडक्यात…

Advertisement

आधारकार्ड वरील फोटो कसा बदलणार..

प्रत्येक नागरिकासाठी आधारकार्ड बनवणं हे गरजेचं आहे. जिथे तुम्हाला स्वत:ची ओळख संबंधित कागदपत्रे जमा करायचे असतात तिथे आधारकार्डची झेरॉक्स कॉपी जमा करावी लागते. UIDAI आधारकार्डवरील माहिती जसं की नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि फोटो बदलण्यासाठी ऑनलाईन सुविधा देत होते. मात्र, आता ही ऑनलाईन सुविधा फक्त पत्ता बदलण्यासाठी देण्यात येते. त्यामुळे आता तुम्हाला नाव, मोबाईल नंबर, जन्म तारीख, ई-मेल आयडी, फोटो बदलण्यासाठी ऑफलाईन अर्ज कारावा लागेल. तुम्हाला फोटो बदलायचा असल्यास तुम्हाला जवळच्या आधारकार्ड केंद्रात किंवा पोस्टाद्वारे अर्ज करावा लागेल.

Advertisement

आधारकार्ड वरील फोटो बदलण्याची सोपी पद्धत जाणून घ्या –

1) सर्वात अगोदर UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

2) तिथे Get Aadhaar सेक्शनवरमध्ये जाऊन अपडेटचा फॉर्म डाऊनलोड करा.

3) हा फॉर्म भरा आणि नंतर तुमच्या जवळील आधारसेंटरमध्ये हा फॉर्म जमा करा.

Advertisement

4) तिथे तुमच्या बोटाचे ठशे, डोळे स्कॅन आणि चेहरा पुन्हा एकदा कॅप्चर केला जाईल.

5) फोटो अपडेट करण्याचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर लगेच तुम्हाला यूआरएन किंवा अपडेट रिक्वेस्ट मोबाईलवर येईल. याच नंबरच्या आधारावर तुमचा नवीन फोटो अपडेट होईल.

Advertisement

6) त्यानंतर पुढच्या 90 दिवसात तुम्हाला नव्या फोटोसह नवं आधारकार्ड पोस्टाने मिळेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement