SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सीए परीक्षेचा निकाल जाहीर, पुनित अग्रवाल, निधी ललवानी प्रथम

मुंबई : सगळ्या परीक्षा कोणती अवघड समजली जाते, ती सीएची. या 2021 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तो फ्लॅश झाला आहे. आयसीएआयने सीए फायनल एअर आणि सीए फाउंडेशन एक्झामचा रिझल्ट रविवारी रात्री उशिरा जाहीर केला. सीए परीक्षेचा निकाल जुना आणि नवीन असे दोन्ही निकाल जाहीर झाले आहेत. आयसीएआयने तीन लिंक दिल्या आहेत.

आयसीएआयने ट्विटरद्वारे निकालाची माहिती दिली. इ मेलद्वारे उमेदवारांना icaiexam.icai.org संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यानंतर निकाल मिळेल. रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे.

Advertisement

परीक्षार्थींंना icai.nic.in या संकतेस्थळावर सर्व माहिती मिळेल. आयसीएआयने सीए नोव्हेंबर परीक्षेचे निकाल 8 फेब्रुवारीत जाहीर केला होता

इथे पहा निकाल
icaiexam.icai.org
caresults.icai.org
icai.nic.in

Advertisement

परीक्षा दृष्टीक्षेपात

सीए फाउंडेशनसाठी 40 हजार परीक्षार्थी होते. त्यापैकी 14 हजार 543 जण उत्तीर्ण झाले. 37 हजार 738 महिला होत्या. 12 हजार 784 उत्तीर्ण झाल्या. सीए फाउंडेशनमध्ये पुनीत अग्रवाल आणि निधी दिनेश कुमार लालवानी यांनी पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावरील चिन्मय बेंगानीने 400 पैकी 359 गुण, तर प्रसन्ना कुमार प्रफुल्ल सुराणाने 357 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. सीए फाउंडेशनच्या मे 2021 च्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन 31 मार्च 2021 पासून सुरू होईल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement