जिओनंतर आता व्होडाफोन, आयडियाने नवीन झक्कास प्लॅन आणलाय. तो प्लॅन पाहून तुम्हीही म्हणाल, ‘व्हॉट ॲन आयडिया सरजी!’ जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया कंपनी एकत्र आली आहे. त्यांनी असा फाडू प्लॅन आणलाय. ज्यामुळे आपला फायदा आहे.
Vi कंपनीनने क्रीडा, विशेष सिनेमे मोफत देण्याची ऑफर आणलीय. त्यासाठी डिस्ने प्लस, हॉटस्टारला सोबत घेतले आहे. यात ग्राहकांना वर्षाचे सबस्क्रिप्शन फ्री मिळेल. त्यासाठी अवघे 399 रुपये मोजावे लागत होते. आता चक्क फुकट आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज योजना जाहीर केलीय. त्यांनाही डिस्ने प्लस हॉटस्टार, व्हीआयपी सबस्क्रीप्शन फ्री मिळेल.
प्लॅनमध्ये अठ्ठावीस दिवसांसाठी वैधता असेल. अनलिमिटेड कॉल, रोज 100 एसएमएस, 3 जीबी डेटा तसेच एकूण 100 जीबीसाठी 16 जीबी अतिरिक्त डाटा मिळेल. 501 च्या रिचार्जवर डेटा ओन्ली पॅक आहे. ज्यामध्ये 56 दिवसांसाठी 75 जीबी डेटा दिला जाईल. 600 रूपयांचाही प्लॅन तसाच भन्नाट आहे.
डिस्ने व हॉटस्टार व्हीआयपीच्या मेंबरशीपसाठी प्रीपेड ग्राहकांना कोणत्याही प्लॅनबरोबर रिचार्ज करावा लागेल. यासाठी तुम्ही व्हीआयच्या वेबसाईटवर जाऊन रिचार्ज करू शकता किंवा अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
‘अशी’ आहे ऑफर-
▪️ व्होडाफोन, आयडियाने प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन आणले आहेत.
▪️ या प्लॅनवर वर्षासाठी सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल
▪️ चार प्रीपेड व एक पोस्टपेड प्लॅन.
इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com
आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in