Take a fresh look at your lifestyle.

अबब! ट्विट केलेल्या पाच शब्दांना मिळाले १४.५ कोटी! तुम्हाला लावायचीय का बोली?

0

कोण कशातून पैसे कमविल याचा नेम नाही. बॅटचा, बॉलचा, कपड्यांचा लिलाव तुम्ही-आम्ही ऐकलाय. पण ट्विट केलं आणि त्यातून पैसे कमावलेत कोट्यवधी. हे जरा जास्तच वाटतंय ना, हो आम्हालाही ते पटलं नाही. पण जरा खोलात गेल्यावर लक्षात आलं सगळं. ट्विटरचे संस्थापक जॅक डॉर्सी यांनीच आपलं ट्विट विकायला काढलंय. त्याची किंमतही अव्वाच्या सव्वा झालीय. आपलं तर डोळंच पांढरे झाले राव.

आता हे पहा, ट्विटर सगळ्या जगात वापरलं जातं. त्याची मोठी क्रेझही आहे. नेमकं ते सुरू कधी झालं आणि कोणी केलं, हा विषय समोर येतो. तर त्याचं असं आहे १७ वर्षांपूर्वी डॉर्सी यांनी केलेलं ते ट्वीट इतिहासात महत्त्वाचा क्षण मानला जातो. आतापर्यंत या ट्विटवर २० लाख डॉलर म्हणजे जवळपास १४.५ करोड रुपये बोली लागलीय.

Advertisement

डॉर्सी यांनी २१ मार्च २००६ रोजी ट्विटर सुरू केलं. पहिलं ट्विट अर्थात त्यांचंच. ‘जस्ट सेटींग अप माय ट्विटर’. असे पाच शब्दांचं ते ट्विट होतं. डॉर्सी यांनीच या ट्विटच्या लिलावाबद्दल माहिती दिली. त्यांनी Valuables@cent ची लिंक पोस्ट केलीय. त्याद्वारे कोणीही ट्विट खरेदी किंवा विकू शकते.

डॉर्सी यांच्या ट्विटला शनिवारी २ मिलीयन डॉलरची जस्टीन सन यांनी बोली लावली. सन हे प्रसिद्ध डिजीटल कंपनी TRON चे संस्थापक आहेत. ट्विटची खरेदी करणे म्हणजे त्याचं डिजीटल सर्टीफिकेट घेण्यासारखं आहे. डॉर्सी यांचं ट्विट त्यांना पाहिजे असेल तोपर्यंत ते ऑनलाईल ठेवू शकतात.

Advertisement

या साईटच्या माहितीनुसार कोणताही डिजीटल कंटेन्ट एका आर्थिक तरतूदीसारखा असतो. त्याची एक वेगळी किंमत असते. जसं एखादा अॅटोग्राफ, चित्र, एखादी रचना किंवा मूर्तीची किंमत असते. हे ट्विटही तसंच असतं. याचं गणित तुम्हाला कळलं का, आम्हाला तर काहीच कळलं नाही. डोकॅलिटी असणाराची ही कामं आहेत. जाऊ द्या, बातमी वाचायची आणि मित्रांमध्ये चर्चा करायची. टेन्शन कायकू लेने का….

इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com

Advertisement

आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in

Advertisement

Leave a Reply