SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 दुपारच्या झटपट बातम्या एका नजरेत

🗣️ मनसेची विचारणा : एकीकडे 100 कोटी, दुसरीकडे मुंबई महापालिका, मग तिला किती टार्गेट ?

▪️ राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी, ‘कुणी तरी सांगितल्या शिवाय पोलिस असे धाडस करणार नाहीत, केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा’

Advertisement

😳 लेटर बॉम्ब: एटीएसने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात केली 2 जणांना अटक

▪️ शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक, अजित पवार आणि जयंत पाटलांना दिल्लीत बोलावले; महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र, पुण्यात भाजपच्या वतीनं अलका टॉकीज चौकात गृहमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी

Advertisement

पेट्रोल भरण्यापूर्वी आजची किंमत जाणून घ्या..

▪️दिल्लीत पेट्रोलची किंमत आज प्रतिलिटर 91.17 रुपये आणि डिझेलची किंमत आज 81.47 रुपये; मुंबईत पेट्रोल 97.57 रुपये तर डिझेल प्रति लिटर 88.60 रुपये

Advertisement

😱 अहमदनगर: बोठेला 3 दिवसांची कोठडी, आणखी काही जणांचा समावेश

▪️ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची 12 लाख रुपयांना दिली होती सुपारी, ही रक्कम बोठे याने कशी उभी केली ? हैदराबादमधील एक महिला फरार आरोपीचा शोध घेणे बाकी, आदी कारणांसाठी बोठे याच्या पोलिस कोठडीत दिवसांची वाढ करण्याची पाटील यांची न्यायालयाकडे मागणी

Advertisement

👮🏻 ऑनड्युटी वाहतूक पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

▪️ सिंधुदूर्गमध्ये कणकवलीतील पटवर्धन चौकात ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांना पेट्रोल अंगावर ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला केलेल्या त्या युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Advertisement

🍇 नाशिक: द्राक्षपंढरीला गारपिटीने झोडपले!

▪️ अवकाळीसह द्राक्षघडाच्या मण्यांवर गारांनी जोरदार तडाखा, निर्यातक्षम द्राक्षांना गारपिटीने तडे गेले; सध्या निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये 25 ते 30 रुपये प्रतिकिलो अशा अत्यल्प दरात शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत केले सौदे

Advertisement

🧐 रत्नागिरी: घरडा केमिकल्स कारखान्यातील स्फोटाची चौकशी होणार

▪️ चिपळूण तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील “घरडा केमिकल्स” या केमिकल उत्पादक कंपनीत काल झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, तर एक कामगार गंभीर जखमी; या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल, उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांची घोषणा

Advertisement

इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com

आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in

Advertisement