SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकार ‘या’ व्यवसायासाठी देतंय 7 लाख रुपये! जाणून घ्या ‘जन औषधी केंद्र’ योजने विषयी

यंदाच्या वर्षी 7 मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी दिनाच्या निमित्ताने 7500 व्या जन औषधी केंद्राला देशाला समर्पित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी केंद्रांची जी संख्या आहे, ती एका वर्षामध्ये 10,000 पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चा केली. या योजनेमधून केंद्र सरकार नागरिकांना स्वस्त दरात औषधांचा पुरवठा करत असते व पुढेही करणार आहे. देशातील सरकार लोकांना या माध्यमातून देशाच्या अनेक भागात पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

Advertisement

आता 7 लाख रुपयांपर्यंत मिळणार प्रोत्साहन रक्कम

मोदी सरकार नवीन जन औषधी केंद्र उघडण्यासाठी 5 लाख रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देत आहे.

Advertisement

याशिवाय हे केंद्र आकांक्षी जिल्ह्यात उघडल्यास आणखी 2 लाख रुपये उपलब्ध होतील. म्हणजेच सदर प्रकरणात प्रोत्साहन रक्कम 7 लाख रुपये असेल.

जर एखादी महिला अपंग, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्या महिलेस यासाठी मोदी सरकार 7 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम देईल. आधी ही प्रोत्साहन रक्कम केवळ अडीच लाख रुपये होती.

Advertisement

औषध विक्रीवर 20 टक्के कमिशन-

आता मोदी सरकार या योजनेंतर्गत जन औषधी केंद्राचे फर्निचर व इतर आवश्यक सुविधा तयार करण्यासाठी प्रति केंद्राला दीड लाख रुपये मदत करत आहे.

Advertisement

तसेच संगणक आणि प्रिंटरसह बिलिंग सिस्टम विकसित करण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक जन औषधी केंद्राला 5000 रुपये देत आहे.

जन औषधी केंद्रावर औषधांच्या विक्रीवर जास्तीत जास्त 20 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते. याशिवाय, प्रत्येक महिन्याच्या विक्रीवर 15% प्रोत्साहन स्वतंत्रपणे दिले जाते.

Advertisement

प्रधानमंत्री जन औषधी प्रकल्प सन 2015 मध्ये सुरू

2015 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान जन औषधी प्रकल्प सुरू केला होता. देशातील सामान्य माणसावरील, गरीब कुटूंब व मध्यमवर्गीय कुटुंबावरचा औषधी खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली होती.

Advertisement

मग आता जन औषधी केंद्रावर देशातील इतर केमिस्ट शॉप्सपेक्षा 90 टक्के स्वस्त दराने औषध उपलब्ध आहेत, कारण ती सर्वसामान्य औषधे आहेत.

जनऔषधी दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान म्हणाले की, अतिशय चांगल्या दृष्टीकोनातून सरकारच्या या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना औषधी फारच कमी दरात असल्याने पैशांची बचत होत खप वाढणार आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदी म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून देशात रोजगाराचे खूप नवीन मार्गही उघडले गेले आहेत व या योजनेमुळे देशातील सर्वसामान्यांना 3,600 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

अर्ज ‘हे’ लोक करू शकतात..

Advertisement

▪️ पहिल्या श्रेणीनुसार, कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशन स्टोअर सुरू करू शकतात.

▪️ दुसर्‍या प्रकारात विश्वस्त, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालये, सोसायटी बचत गट

Advertisement

▪️ तिसर्‍या प्रकारात राज्य सरकारकडून नामनिर्देशित संस्था आहेत.

जर आपण जनऔषधी केंद्र सुरू करण्यास तयार असाल तर (अर्ज शुल्क म्हणून 5000 भरून )तुम्हाला जन औषधी केंद्राच्या नावावर रिटेल ड्रग सेल्सचा परवाना घ्यावा लागेल. त्यासाठी http://janaushadhi.gov.in/online_registration.aspx वर जाऊन तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.

Advertisement

इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com

आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in

Advertisement