SpreadIt News | Digital Newspaper

‘या’ कारणासाठी महिलेने तुरुंगातील पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दाखल केली याचिका, नेमकं प्रकरण काय ?

0

भारतात अलीकडे कायद्याबाबत लोक अधिक जागरूक झाले आहेत. आपल्या हक्काची लढाई लढण्याचे सामर्थ्य अनेक जणांमध्ये असते, संघर्ष करून ते ती लढाई वर्षानुवर्षे चालू ठेवतात. अशीच एक आव्हानात्मक याचिका एका महिलेने दाखल केली आहे.

महिलेने दाखल केलेल्या याचिकेबद्दल..

Advertisement

तुरुंगात बंद असलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करणारी याचिका एका महिलेनं हरियाणा उच्च न्यायालयात दाखल केली आहे. गुरुग्राम न्यायालयाने याचिकाकर्त्या महिलेच्या पतीला हत्या आणि इतर गुन्ह्यांत दोषी ठरवलं आहे.

संबंधित महिलेचा पती 2018 पासून भोंडसी जिल्हा तुरुंगात कैद आहे. यावेळी महिलाने आपल्या याचिकेत म्हटलं की, मला अपत्य हवं आहे, त्यामुळे मला माझ्या पतीशी शारीरिक संबंध ठेवायचा आहे.

Advertisement

महिलेने याचिकेत म्हटले, “तुरुंगात राहणाऱ्या व्यक्तीला आपला वंश पुढे वाढवायचा अधिकार आहे. वंशावळ पुढे चालविण्यासाठी मला माझ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी परवानगी द्यावी”, अशी मागणी त्या महिलेनं उच्च न्यायालयात केली आहे.

याचिकाकर्त्या महिलेच्या वकीलाने म्हटलं की, मानवाधिकार कायद्यांनुसार तुरुंगात कैद असलेल्या व्यक्तीच्या महिलेला वंशावळ पुढे घेऊन जाण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानातील कलम 21 नुसार याचिकाकर्त्या महिलेला वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे.

Advertisement

न्यायालयाने मागितलं उत्तर-

आता याप्रकरणी हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा गृह खात्याला नोटीस पाठवली असून या महिलेच्या याचिकेवर उत्तर देण्यास लावलं आहे. गृह खात्यानं सध्या तरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावेळी उच्च न्यायालयाने जसवीर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्याची आठवण करून दिली.

Advertisement

तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांची वंशावळ वाढवण्यासाठी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत धोरण तयार केलं आहे का ? असा प्रश्न यावेळी अ‍ॅडव्होकेट अ‍ॅडिशनल जनरल यांनी न्यायालयात विचारला असून याबाबत हरियाणा गृह खात्यानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com

Advertisement

आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in

Advertisement