बँकेसह वित्तीय क्षेत्रासाठी हा महिना अत्यंत महत्वाचा आहे. मार्च महिना संपला की आर्थिक वर्ष ही संपते. दरवर्षी आर्थिक वर्षाचा मार्च हा शेवटचा महिना असतो, म्हणून भारतातील सर्व बँकांना 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्षासाठी आपले खाते बंद करावे लागते वा आर्थिक बाबतीत सर्व काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात.
म्हणून जर आपण 26 मार्चपर्यंत बँकेतील काम पूर्ण केले नाही तर आपल्याला एक आठवडा जास्त काळ थांबावे लागेल. महत्वाचं म्हणजे आता जर बँकेत तुमचं काही काम असेल तर ते लवकरात लवकर करून घ्या
बँका बंद ?
या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बँकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे आपली बँकिंगची कामे तात्काळ करुन घ्यावी. आपल्याला पैशाची अडचण होऊ नये व बँकेतील इतर कामे बाकी असतील तर ताबडतोब उरकून घ्या.
तर रविवार, 21 मार्च रोजी बँका बंद राहतील आणि 22 मार्च ते 26 मार्च दरम्यान बँका चालू असतील. मग 27 मार्च रोजी चौथा शनिवार आहे आणि 28 मार्चला रविवार येत आहे, म्हणून या दोन्ही दिवशी बँका बंदच राहतील. यानंतर 29 मार्चपासून लगेच नवीन आठवडा सुरू होणार आहे. 29 मार्च रोजी होळीमुळे बँका बंद राहणार आहेत. 30 मार्च रोजी पाटण्यातील सर्व बँका बंद राहतील.
आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून…
सध्याच्या आर्थिक वर्षाचा 31 मार्च (बुधवार) हा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी बँका खुल्या राहतील, परंतु खाते बंद झाल्यामुळे बँकेत सार्वजनिक व्यवहार केले जाणार नाहीत. सर्व काही नवीन आर्थिक वर्ष (2021-22) 1 एप्रिलपासून सुरू होईल.
बघा, 1 एप्रिल रोजी गुरुवार आहे आणि मार्च एंड आल्यामुळे क्लोजिंगची प्रक्रिया पूर्ण करुनच नवीन प्रक्रिया सुरु करावी लागते. यादरम्यान बँकेत सार्वजनिक व्यवहार केले जात नाहीत. म्हणजे 2 दिवस (31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी बँक सर्वसामान्यांसाठी बंद असल्याचे समजते). बँक सरकारशी असणारे आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करते आणि आपले खाते बंद करते.
बँकांना सुट्ट्या कधी आणि सुरू कधी राहणार ?
27 मार्च – महिन्याचा दुसरा शनिवार, बँक बंद
28 मार्च – रविवार, बँक बंद
29 मार्च – होळीनिमित्त बँक बंद
30 मार्च – पटनातील बँका बंद , अन्य शहरांमध्ये बँका सुरु
31 मार्च – आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस, सार्वजनिक व्यवहार बंद
1 एप्रिल – नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, बँक अकाऊंट क्लोजिंगमध्ये व्यस्त असेल
2 एप्रिल – गुड फ्रायडे निमित्त बँक बंद
3 एप्रिल – बँक सुरु
4 एप्रिल – रविवार असल्याने बँक बंद राहिल
5 एप्रिल – यानंतर बँकेचे नियमित कामकाज सुरु
इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com
आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in