SpreadIt News | Digital Newspaper

चंद्रावरील राहण्याची अनुभूती घ्यायची! पण यासाठी लागतो एवढा खर्च; जाणून घ्या नेमके प्रकरण काय…

0

पृथ्वीवरील गोंधळपासून अगदी दूर राहावे असे वाटते, तर प्रत्येकाला तेथेच घर बांधून निवांत राहणे असे देखील स्वप्न असते आणि आता हे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ फार दूर नाही.

चंद्रवरील यात्रा आणि चंद्रावर जमीन खरेदीच्या बातम्या सतत येत असतात. मग जमीन खरेदी केल्यावर तेथे घर बांधून राहण्याचा विचार देखील प्रत्येकाला येतो. परंतु, यासाठी महिन्याकाठी तुम्हाला किती खर्च करावे लागतील याची संपूर्ण माहिती “मनी’ नामक क्रेडिट ब्रोकर कंपनीने दिली आहे.

Advertisement

या कंपनीच्या माहितीनुसार..:

ग्राहकांना पसंतीची उत्पादने खरेदी करण्यासाठी काही कंपनी कर्ज देते. याच कंपनीने नुकतेच एक पत्र जाहीर करून माहिती दिली आहे. यात चंद्रावर राहण्यासाठीचा खर्च देण्यात आला आहे.

Advertisement

नासाचे एक पथक 2024 मध्ये आर्टेमिस मोहिमेअंतर्गत चंद्रावर स्थायी बांधकामासाठी जागा शोधण्यासाठी जाईल. गाइडनुसार, चंद्रावरील बांधकामासाठी साहित्य पृथ्वीवरूनच पाठवले जाईल.

मनी फर्मच्या अंदाजानुसार चंद्रावर सर्वप्रथम घर बांधणाऱ्याला साधारण 360 कोटी रुपये खर्च करावे लागतील. त्यात चंद्रापर्यंत प्रवास, साधन सामुग्री, मजूर, कच्चा माल नेणे हा खर्च आहे.

Advertisement

दुसऱ्या घराचा खर्च थोडा कमी होईल. कारण, सामग्री आणि मजूर चंद्रावर असतीलच. तेथे विशेष प्रक्रियेने अन्न उगवेल. आण्विक भट्टी वीज पुरवेल. यासाठी ग्रीन हाऊस उभे राहतील.

त्यानंतर हळू हळू हा खर्च कमी होईल कारण तो पर्यंत चंद्रावर मजूर उपलब्ध असतील. त्यांच्या प्रवासाचा खर्च करावा लागणार नाही.

Advertisement

चंद्रावर वीज निर्माण करण्यासाठी छोटे अणुकेंद्र उभारले तर त्यासाठी 1.3 अब्ज डॉलर्स खर्च येईल पण हेच काम 34 सौर पॅनल लावले तर एका घरासाठी वीज निर्माण होऊ शकेल. याचा खर्च 23616 डॉलर्स असेल असाही अंदाज मनी या नामांकित कंपनीने दिला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement