Take a fresh look at your lifestyle.

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ शनिवार, 20 मार्च 2021

मेष : तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल.

Advertisement

वृषभ : कफाचा त्रास जाणवेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.

मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्य चांगले राहील. सामाजिक वादात अडकू नका. धार्मिक कामात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका.

Advertisement

कर्क : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांसाठी खर्च कराल. कौटुंबिक काळजी लागून राहील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.

सिंह : प्रवासाचे बेत ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कलेसाठी वेळ काढता येईल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.

Advertisement

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरांचे सुख चांगले राहील. दिवस काहीसा आळसात जाईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल.

तुळ : आत्मविश्‍वास व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. प्रसिद्धी लाभेल. क्षुल्लक मतभेद मनात धरून ठेवू नका. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

Advertisement

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका. प्रेमसौख्याला बहर येईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल.

धनु : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात, विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे.

Advertisement

मकर : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वादविवाद टाळावेत. सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखाल. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल.

कुंभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील.

Advertisement

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनाची विशालता दाखवाल. मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement

Leave a Reply