SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमृता वहिनींच्या ट्विटमुळे उडणार राजकीय धुरळा! व्यवहार माझे, जबाबदार वाझे

मुंबई :  सध्या अंबानींच्या घरासमोरील वाहनात सापडलेल्या स्फोटकांमुळे राजकीय वातावरण तापलंय. सरकारला धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न चालवला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच नवा वाद समोर येतो. तो यावेळीही येण्याची शक्यता आहे. त्यांनी ट्विटमधून ठाकरे कुटुंबांना डिवचलं आहे. फडणवीस सरकार येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना ठाकरे सरकार आल्यापासून त्या ठाकरे कुटुंबाविषयी ट्विट करतात.

ठाकरे सरकारने कोरोनाबाबत माझे कुटुंब माझी जबाबदारी नावाने कॅम्पेन चालवले होते. मीच जबाबदार अशीही टॅगलाईन होती. त्याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांचे ट्विट आहे. त्या लिहितात… व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू…

Advertisement

आता त्यांचा रोख कोणाकडे आहे, हे ज्याने त्याने समजून घ्यावे. त्या नेहमीच राजकीय भाष्य करीत आल्या आहेत. मागील पंधरवड्यात वेडी कुठली…असं गाणं आलं होतं. आता त्यांचे नवीन फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल होतं आहे. त्या बिनधास्तपणे सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात.

ठाकरे सरकारला धारेवर धरताना त्या लिहितात, लोकांना उपचार घेण्यासाठी बेड नाहीत. आणि दुसरीकडे कोव्हिड सेंटर भ्रष्टाचारीच कुरण बनली आहेत. आपल्या हस्तकांकरवी खंडणीसाठी उद्योगपतींना धमक्या दिल्या जात आहेत. एवढं नक्की त्यांच्या नव्या ट्विटने राजकीय धुरळा उडणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement