SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकरी असल्याचा दाखला ‘असा’ मिळवा; अर्ज कुठे करायचा आणि काय असते प्रक्रिया जाणून घ्या!

आपला देश कृषीप्रधान आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक शेती करतात. कोणाच्या काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही केवळ कृषी आणि कृषिपूरक व्यवसाय यांनी सावरण्याचे दाखले आहेत शेतकरी असल्याचे देखील प्रमाणपत्र मिळते. मात्र, ते कुठे काढायचं आणि त्या प्रमाणपत्राचा फायदा नेमका काय आहे? तो कसा करून घ्यायचा? याची माहिती आपल्या जवळ असणे देखील आवश्यक आहे.

कृषी शाखेची पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला मिळतो. जमीन खरेदी करताना देखील शेतकरी प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते कसे मिळते हे आपण जाणून घेऊ!

Advertisement

शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपले सरकार या पोर्टल वर देखील उपलब्ध होते. जो सोपा पर्याय वाटेल, त्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. या वेबसाईटला तुम्ही भेट देऊन प्रमाणपत्र मिळवू शकता.

ही आवश्यक कागदपत्रे जरूर जवळ बाळगावी

Advertisement

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा रोजगार हमी योजना ओळखपत्र, अगदी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा फोटो यापैकी सरकारकडून देण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र चालते.

Advertisement

पत्ता दाखवणारे प्रमाणपत्र

तुमचा पत्ता हा नेहमी पासपोर्ट, आधार कार्ड किंवा तुमच्या कोणत्याही ओळखपत्रावर असतो. अगदी वीज बलावर किंवा सातबार्यावर देखील तुम्हाला तुमचा पत्ता दर्शवणारा पुरावा मिळू शकतो. याची तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गरज भासते.

Advertisement

कागदपत्रे
ओळखपत्र आणि पत्ता दर्शवणारा कोणताही पुरावा तुमच्याकडे असेल तर इतर कागदपत्रांमध्ये तुम्हाला सात बारा, 8 अ उतारा उपलब्ध करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र इतर कागदपत्रांमध्ये शेतकरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरते.

स्वयंघोषणापत्र

Advertisement

शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वयंघोषणापत्र भरून द्यावे लागते. हे सगळ्यांसाठी अनिवार्य असते आणि अर्जासोबत भरून दिल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र मंजूर होते. तहसीलदार कार्यालयात सर्व कागदपत्रांसह इतर अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रीयत्व, वय तसेच अधिवास प्रमाणपत्र मिळून जाते.

आपले सरकार पोर्टलवरून असा करा अर्ज

Advertisement

आपले सरकार वर च्या वेबसाईट वर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंक वरून नाव, मोबाईल नंबर, आणि ईमेल आयडी टाकून तुम्ही लॉगीन तयार करून घेतल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग तुम्हाला पाहायला मिळतील. यातून महसूल विभाग निवडल्यानंतर महसूल सेवा निवडा. तिथून शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे उघडणार्‍या विंडोमध्ये आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची यादी वाचून घ्या. ती प्रमाणपत्रे तयार ठेवा तुम्हाला वेबसाईट वर अपलोड करण्यासाठी अनिवार्य असतात.

अपलोड करायची कागदपत्रे ज्या साईज मध्ये सांगितली आहेत त्याच साईज मध्ये अपलोड करा. फोटो, सही हे डिजिटल फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागते. अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर मिळणारी पावती सेव्ह करून ठेवा. पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला शेतकरी प्रमाणपत्र मिळून जाईल.

Advertisement