SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्टस् घेऊन निवडा उज्वल करियर!

करिअर ही आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवडीचे करिअर निवडणे गरजेचे असते. आतापर्यंत करिअर म्हणजे केवळ विज्ञान शाखेच्या मुलांची मक्तेदारी असे प्रत्येकाला वाटायचं. मात्र, आर्ट्स केलेले मुले देखील भविष्य उज्ज्वल करणारे करिअर निवडू शकतात आणि व्यवस्थित पैसे कमवू शकतात अशी परिस्थिती आज आहे. आपण जाणून घेऊयात आर्ट्स निवडून कोणते करिअर केल्याने व्यवस्थित कमाई करता येते.

वकिली : आर्ट्स निवडलेल्या मुलांसाठी व केली हा उत्तम व्यवसाय असू शकतो. वकिली करण्यासाठी बारावीनंतर पदवीसाठी प्रवेश मिळू शकतो. एक एन्ट्रान्स क्लिअर करून तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी हव्या त्या नामांकित विद्यापीठात प्रवेश घेऊ शकता.

Advertisement

परदेशी भाषा : फॉरेन लँग्वेज म्हणजेच परदेशी भाषा शिकून देखील भाषांतर करणारी व्यक्ती म्हणून एक उत्तम पगाराची नोकरी तुम्हाला मिळू शकते किंवा त्यात तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. यासाठी आर्ट्स ची पदवी असलेले विद्यार्थी डिप्लोमा किंवा डिग्री करून फॉरेन लॅंग्वेज चे ज्ञान मिळवू शकतात. मंत्रालयामध्ये किंवा परराष्ट्र खात्यामध्ये अनेकदा भाषांतर करणाऱ्या व्यक्तीची गरज भासते या लोकांना एक तासाच्या भाषांतराला हजारो रुपये दिले जातात. मल्टिनॅशनल कंपनीत सुद्धा आशा विविध भाषांचे ज्ञान असलेल्या लोकांची गरज भासते.

पत्रकारिता : आर्ट्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता देखील खूप महत्त्वाचे करियर आहे. लिखाणाची आवड आणि धैर्य असलेल्या व्यक्ती त्याचबरोबर उत्तम संवाद साधण्याची कला असलेल्या व्यक्ती या क्षेत्रात आपले नाव चमकवू शकतात. इलेक्ट्रॉनिक मिडीया त्याचबरोबर प्रिंट मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदा घेण्यासाठी हे करियर खूप महत्त्वाचे आहे.

Advertisement

फॅशन डिझायनर : थोडेसे कलेचे ज्ञान आणि फॅशन डिझाइनिंगची आवड, तुम्हाला फॅशन डिझायनर म्हणून उत्तम संधी मिळवून देऊ शकते. या क्षेत्रात करिअर करताना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी देखील तुम्हाला उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. डिप्लोमा, डिग्री करून तुम्ही उच्च विद्या विभूषित फॅशन डिझायनर म्हणून नावारूपास येऊ शकता.

शिक्षक : आर्ट्स केलेल्या व्यक्तीला शिक्षक होण्याची देखील संधी मिळू शकते. डिग्री घेतल्यानंतर तुम्ही बी एड आणि डीएड साठी ॲडमिशन घेऊ शकता. यानंतर सीईटी दिल्यानंतर तुम्हाला शिक्षक म्हणून शाळेत किंवा महाविद्यालयात व्यवस्थित पगाराची नोकरी लागू शकते.

Advertisement

शेअर मार्केट : आर्ची डिग्री आणि शेअर मार्केटचे थोडेसे ज्ञान तुम्हाला एक ट्रेडर म्हणून व्यवस्थित कमाई मिळवून देऊ शकते. शेअर मार्केटचे विविध कोर्सेस करून, तुम्ही स्वतःच्या ज्ञानात भर पडू शकता आणि रोजच्या उलाढालीवर स्वतःचे पैसे गुंतवून कमी पुंजीतून जास्त फायदा मिळवू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement