Take a fresh look at your lifestyle.

दहावी-बारावी पासिंगसाठी 35 की 25 टक्के मार्क्स? बोर्डाने केला मोठा खुलासा

0

मागच्या वर्षी कोरोना दहावी व बारावीसह सर्वच विद्यार्थ्यांचे नुकसान केले. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून परीक्षांबाबत संभ्रम झाला निर्माण झाला आहे. त्याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने खुलासा केला आहे.

दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने सरकार गांभीर्याने या तारखांबाबत विचार करण्याची शक्यता आहे. त्या बदलण्याची शक्यता आहे. ते काहीही असले तरी तुम्ही अभ्यासाकडील लक्ष द्यायचे सोडू नका.

Advertisement

परीक्षा लेखी स्वरूपात होईल. त्याबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बोर्डाने मोठा खुलासा केला आहे. गेल्या वर्षांपासून उत्तीर्ण होण्यासाठी 35 टक्के गुणांची आवश्यकता आहे.

मात्र, कोरोना काळात हेच गुण 25 टक्के केले असल्याचे सांगितले जात होते. सोशल मीडियात तसे मेसेज फिरत होते. त्या केवळ अफवा आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला पूर्वीप्रमाणेच 35 टक्के गुण आवश्यक आहेत, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांनी कोणताही संभ्रम न बाळगता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती दिलेली असते. ती पहावी. उगाच सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये.

इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com

Advertisement

आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in

Advertisement

Leave a Reply