ब्रेकिंग: दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार, वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेत अनेक घोषणा!
गेल्या काही दिवसांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जेथे कंटेन्मेंट झोन आहेत, तेथील विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची, असे एक ना अनेक प्रश्न पालकांना पडले होते. त्याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. तसेच परीक्षा कशा पद्धतीने होणार याचीही माहिती त्यांनी सांगितली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेत खालील घोषणा
दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पूर्वी जशा वर्गात घेतल्या जात होत्या, तशाच घेतल्या जाणार आहेत.
यावर्षी परीक्षा अर्धा तास अगोदर सुरु होणार, सकाळी १०.३० वाजता सुरु होणार परीक्षा
परीक्षेसाठी वर्ग खोल्या कमी पडल्यास शेजारच्या कॉलेजच्या वर्ग खोल्या घेता येतील.
लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दिलासा देणारा निर्णय आहे. लॉकडाउनच्या काळात तसेच शाळा रोज न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना लिहिण्याचा सराव राहिलेला नाही. त्यामुळे जास्तीचा अर्धा तास दिला जाणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीचा वेळ दिला जात होता. तो प्रत्येक तासासाठी २० मिनिटे असा तीन तासांसाठी साठ मिनिटे वाढवून दिली जातील.
प्रॅक्टीकलाबाबतही बदल केला जात आहे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. प्रॅक्टीकल असाईनमेंट म्हणजे गृहपाठ पद्धतीने घेतले जाईल. त्याचीही मुदत ठरवून दिलेली आहे.
या परीक्षांच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ठरल्याप्रमाणेच परीक्षा होतील. ज्या भागात कंटेन्मेंट झोन आहेत, तेथील विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.
ज्यांना परीक्षा देता येणार नाही त्यांची परीक्षा जून मध्ये घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit