SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फायदाच फायदा ! Jioचा पुन्हा एकदा भन्नाट प्लॅन, हा प्लॅन नक्की आहे तरी कोणता, वाचा..

आपल्याला माहितीच आहे की, मुकेश अंबानी यांची जिओ बाजारात येण्यापूर्वी आप्तजनांसोबत बोलणंही महागात पडायचं. त्यामुळे मिस्डकॉल संस्कृती होती. प्रत्येकाचीच ती तऱ्हा होती. कॉल करणे महागात पडायचं. कधी कधी मेसेजवरच काम चालवून नेलं जायचं. पण जिओने क्रांती केली. सुरूवातील फुकट आणि 200 रूपयांचा प्लॅन. त्यात 28 दिवस कॉल आणि डेटा फ्री. त्यामुळे पटापट इतर कंपन्यांनाही दर कमी केले आणि ते तुमच्या आमच्यासारख्यांच्या पथ्यावर पडलं.

आताही तशीच योजना घेऊन आले आहे जिओ. दोन हजारांचा फोन जिओने मार्केटमध्ये आणलाय. त्यात दोन वर्ष एकदम फ्री आहे. अनलिमिडेट कॉलिंग, मेसेजेस आणि फ्री इंटरनेट. जिओने बाकी युजर्ससाठीही पाच भन्नाट प्लॅन आणले आहेत.

Advertisement

जिओच्या प्लॅनमध्ये तुम्ही अगदी 75 रुपयांपासून सहभागी होऊ शकता. 28 दिवसांसाठी सर्व फुकट असेल. दररोज 100MB डेटा, तो संपल्यावर तुम्ही 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 50 एसएमएसचा बेनिफीट आहे, तो वेगळाच.

125 रुपयांचा प्लॅन – यात 28 दिवसांसह रोज 500MB डेटा. तो संपल्यानंतर 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरता येईल. अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 300 एसएमएस विनामूल्य मिळेल.

Advertisement

बेस्ट सेलर स्किम

जिओफोनचा 155 रुपयांचा प्लॅन – ही कंपनीची बेस्ट सेलर योजना आहे. ज्यामध्ये आपल्याला 28 दिवसांची वैधता मिळते. या योजनेत आपल्याला दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस विनामूल्य मिळतील. दररोजचा डेटा संपल्यानंतर आपण 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळेल.

Advertisement

185 रुपयांचा प्लॅन – यात आपल्याला दररोज 2GB डेटा मिळेल. डेटा संपल्यानंतर आपण 64 केबीपीएसचा इंटरनेट स्पीड मिळेल. या व्यतिरिक्त तुम्हाला दररोज 100 एसएमएस मिळतील. आणि अनलिमिटेड कॉलिंग.

वर्षासाठीचा प्लॅन – जियोफोनचा 749 रुपयांचा प्लॅन कंपनीने नुकतीच ही योजना सुरू केली आहे. वर्षासाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळेल. यासह, प्रत्येक 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा आणि 50 एसएमएस मिळतील. विनामूल्य डेटा संपल्यानंतर आपण 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरू शकता.

Advertisement

हे आहे चक्क फुकट – JioPhoneच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधांव्यतिरिक्त आपण JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या ऍप्सचा फ्रीमध्ये वापर करू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement