SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सिलेंडर 312 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हवंय ? मग फक्त ‘हे’ काम करा..

भारतात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या महागाईने सर्वसामान्यांना चिंतेत भर टाकली आहे. तर त्याहीपेक्षा महागाईचा सर्वाधिक त्रास हा आपल्या कुटूंबातील स्वयंपाक घरात राबणाऱ्या गृहिणींना होत आहे. कारण घरगुती गॅस सिलिंडरचे दर आकाशाला भिडले आहेत.

सविस्तर सांगायचं झालं.. तर मागच्या काही महिन्यांतच घरगुती गॅस सिलिंडरचे दर सुमारे 200 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरांची अवस्था बिकट झाली आहे.

Advertisement

पण समजा जर आपल्याला अतिशय कमी किंमतीत जर घरगुती गॅस सिलिंडर भेटले तर..? तुम्हाला 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत गॅस सिलेंडर उपलब्ध आहे, आपल्याला तो कसा मिळवायचा हे निश्चितपणे जाणून घेण्याची इच्छा असेल, तर तो मिळवण्याची प्रक्रिया काय एकदा जाणून घ्या…

आपल्या माहितीप्रमाणे, सरकार घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान देत असते. यातही विशेष म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडरवरील अनुदान 174.80 रुपयांवरून 312.80 रुपयेपर्यंत आहे. जर आपण या योजनेंतर्गत नोंदणीकृत असाल, तर आपण गॅस सिलेंडरवर 312 रुपये आजच वाचवू शकता.

Advertisement

तुम्हाला काय करावं लागेल..?

आधार लिंक करा- प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलेंडरवर अनुदान मिळण्यासाठी तुमचे आधार कार्ड या योजनेशी लिंक असलेच पाहिजे, तसे न केल्यास अनुदानाची रक्कम खात्यात येणार नाही.

Advertisement

तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तरच अनुदान आपल्या खात्यात येते. यासाठी आपला मोबाईल नंबर गॅस एजन्सीमध्ये नोंदणीकृत असणे देखील आवश्यक आहे. जर आधार लिंक केलेले नसेल किंवा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसेल तर ही सुविधा उपलब्ध होणार नाही.

नोंदणी ‘अशी’ करणार – तुमचं आधार कार्ड 3 प्रकारे नोंदणीकृत केलं जाऊ शकतं. पहिले मोबाईल नंबरद्वारे, दुसरे एसएमएसद्वारे आणि तिसरे यूआयडीएआय वेबसाईटवर नोंदणीकृत करू शकतात. जेव्हा आपला मोबाईल नंबर नोंदणीकृत असेल, तेव्हा आपण यूआयडी <आधार नंबर> टाईप करून आणि गॅस एजन्सी क्रमांकावर पाठवून पुन्हा वितरित करू शकता. एकदा का नोंदणी झाली तर आपल्या मोबाईलवर तशी माहितीही पाठवण्यात येते.

Advertisement

मोबाईल नंबरवरून एसएमएसद्वारे नोंदणी न झाल्यास अथवा शक्य न झाल्यास आपण इंडेनच्या गॅस एजन्सीच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 2333 5555 वरही संपर्क करू शकता.

UIDAI वेबसाईटद्वारे आधार ‘असं’ करा लिंक – जर तुम्हाला गॅस सबसिडीसाठी आपला आधार लिंक करायचा असेल तर आपण हे काम यूआयडीएआय वेबसाईटद्वारे देखील करू शकता. यासाठी वेबसाईटवर आपले नाव पत्ता, योजना, गॅस वितरक माहिती भरून आपण आपले आधार वेबसाईटद्वारे लिंक करू शकता आणि आपण या सोप्या पद्धतीने अनुदान मिळवू शकता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement