Take a fresh look at your lifestyle.

✅ आता रेशन साठीच्या रांगेला पूर्णविराम; सरकारकडून ‘मेरा रेशन ॲप’ लाँच!

0

रेशन कार्ड आणि त्याद्वारे मिळणारे धान्य हे अनेकदा डोकेदुखी ठरू शकते. बऱ्याच लोकांची सतत बदली होत असते, आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रेशन कार्ड वर धान्य मिळेलच असे नाही. अनेक लोकांची परिस्थिती तेवढी चांगली नसते म्हणून, ते देखील स्वस्त धान्य दुकान म्हणजेच रेशनच्या धान्यावर अवलंबून असतात.

रेशनच्या रांगेत उभे राहायचे या गोष्टीचा कंटाळा किंवा त्यातून होणारा त्रास यामुळे अनेक जण रेशन दुकानावर जाणेच टाळतात. यातून अनेकदा काळाबाजार होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीला आता पूर्णविराम लागणार आहे. सरकारने मेरा रेशन आता लॉन्च केले आहे. हे ॲप डाउनलोड कसे करायचे आणि कसे वापरायचे जाणून घेऊया!

Advertisement
 • सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरवर जावं.
 • सर्च बॉक्समध्ये मेरा रेशन ॲप असं सर्च करावं.
 • आलेल्या सर्च रिझल्ट्समधून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावं.
 • त्यानंतर ते ॲप ओपन करावं.
 • स्वतःचे रेशन कार्ड डिटेल्स भरून रजिस्ट्रेशन करावं.

‘मेरा रेशन’ चे फायदे

 • सातत्याने बदली, स्थलांतर होणाऱ्या व्यक्तींना सर्वांत जास्त उपयुक्त
 • रेशन दुकानाबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.
 • रेशन कार्डधारक या ॲपद्वारे स्वतःच्या सूचनाही सांगू शकतात.
 • रेशन धान्य घेण्यासंदर्भातली सगळी माहिती मिळेल.
 • किती, कोणतं धान्य कधी मिळणार आहे, याचीही माहिती मिळेल.
 • सर्वांना सहज रेशन धान्य उपलब्ध होईल.

मेरा रेशन ॲपद्वारे लोकांना त्यांच्यापासून सर्वांत जवळ असलेल्या रास्त धान्य दुकानाची माहिती मिळेल. तसंच आपली पात्रता, अलीकडे केलेले व्यवहार वगैरे माहितीही त्यातून मिळू शकेल. सध्या हे ॲप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच ते आणखी 14 भाषांमध्ये उपलब्ध केलं जाणार आहे.

Advertisement

Leave a Reply