तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा विषय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणालाही सरकारी नोकरीत जाऊन करिअर करावे वाटणे सहाजिकच आहे. परंतु ते वाटते तितके सोपे नाही, आणि अवघड तर बिलकुल नाही. त्यासाठी काही फंडे आहेत, ते आजमावले की सगळं सोप्पं होतं.
या परीक्षेत सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे करंट अफेअर्स (चालू घडामोडी). हा मोठा आवाका असलेला टॉपिक आहे. वर्तमानपत्र, वार्षिक पुस्तक, वेबसाईट आदी वेगवेगळ्या स्रोतांचा विद्यार्थ्यांना आधार घ्यावा लागतो.
▪️ प्रश्नपत्रिकांचे निरीक्षण महत्त्वाचे..
मागे होऊन गेलेल्या कोणत्याही विषयाची मागील वर्षांची प्रश्नपत्रिका गोळा करा आणि तेथून करंट अफेअर्समधून प्रश्न निवडा. कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. कधीकधी थोड्याशा बदलासह किंवा त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न विचारले जातात. त्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवणे महत्त्वाचे आहे.
पीआयबी, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ आदी भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही चालू घडामोडी कळतात. दर्जेदार वर्तमानपत्रही आपल्याला माहिती पुरवित असतात. बातम्यांसोबत त्यांचे अग्रलेखही वाचत चला, त्यातून सगळ्या राजकारण, समाजकारण, क्रीडा, अर्थकारण असा बऱ्याच गोष्टींचा आढावा घेता येतो.
▪️ ग्रुप डिस्कशन –
करंट अफेअर्सच्या विषयाची पार्श्वभूमी, सारांश आणि उपयुक्तता जाणून घेण्यासाठी ग्रुप डिस्कशन (गटचर्चा) सर्वोत्तम स्रोत आहे. आपण कोणत्या परीक्षेची तयारी करीत आहात, त्या परीक्षेची तयारी करीत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसमवेत गटामध्ये अभ्यास करा.
▪️ क्वीझसाठी वेळ द्या –
कोणत्याही विषयात निपुण होण्यासाठी फक्त ते वाचणे पुरेसे नाही तर त्यासंबंधित प्रश्नही सोडवायला हवेत. हा विषय गणिताचा असो की करंट अफेअर्स, प्रश्नोत्तरे किंवा क्वीझ प्लॅटफॉर्मचे, महत्त्व सर्वत्र सारखेच आहे. म्हणून आपण सद्य:स्थितीसंबंधित काही प्रश्न वाचले आणि त्यावर दररोज सराव केल्यास हे चांगले होईल.
▪️ व्हिडिओचे साहाय्य घ्या
सध्या व्हिडिओची क्रेझ आहे. विविध अभ्यास केंद्रे विद्यार्थ्यांना मनोरंजक आणि ज्ञानवर्धक अशा विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ ट्यूटोरियल बनवीत आहेत. यू ट्यूब चॅनल्सही आले आहेत. त्याचा उपयोग करता येईल.
▪️ विश्वासार्ह वेबसाईट पाहा
बऱ्याच वेबसाईट्स करंट अफेअर्सवर अपडेट देत असतात. परंतु त्या खऱ्या किती आणि खोट्या किती असा प्रश्न येतो. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विज्ञान आणि तंत्रज्ञान आदी विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळेल अशी विश्वासार्ह वेबसाईट निवडा.
▪️ ई-बुक –
प्रत्येक विषयावर मार्गदर्शक असतात, तसाच एक चांगला प्रकाशक ऑनलाईन ई-बुक देखील प्रदान करतो. काही ई-बुकमध्ये प्रत्येक महिन्याची संपूर्ण माहिती असते, जी एकदाच डाऊनलोड आणि वाचली जाऊ शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit