SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एलआयसीची पॉलिसी तुम्हाला करेल मालामाल, फक्त 100 रुपये भरा आणि मिळवा ‘इतके’ लाख रुपये !

विमा क्षेत्रात एलआयसीने मोठे काम केले आहे. हीच एलआयसी स्वतःचा आयपीओ आणीत आहे. विमा क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या आहेत. परंतु एलआयसीने गरिबांचा विश्वास जिंकला आहे. त्यांचे घोषवाक्यच आहे. जिंदगी के साथ भि और जिंदगी के बाद भी. याच एलआयीने गरिबांना मालामाल करणारी स्किम आणली आहे.

जीवन विमा महामंडळाने आम आदमी बीमा योजना आणली आहे. त्याचा गरिबांना नक्कीच फायदा होणार आहे.

Advertisement

कशी आहे योजना…?

विम्यातही वर्गवारी आणि फायदा –

Advertisement

▪️ नैसर्गिक मृत्यू – रु. 30,000/-

▪️ अपघाती मृत्यू – रु.75, 000/-

Advertisement

▪️ अपघातामुळे कायमचे अपंग – रु.75, 000/-

▪️ अपघातामुळे दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास – रु.75, 000/-

Advertisement

▪️ अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास – रु.37,500

मुलांना शिष्यवृत्तीही मिळते –

Advertisement

शिष्यवृत्ती लाभांतर्गत या विमा योजनेच्या 9 वी ते 12 वी या दरम्यान शिक्षण घेणाऱ्या 2 मुलांना लाभ मिळतो, त्यात दर मुलाला 100 रुपये दराने शिष्यवृत्ती दिली जाते.

जर विमाधारकास काही अपघात झाला तर एलआयसी लाभार्थ्यांना एनईएफटीमार्फत किंवा अकाऊंट क्रेडिट द्वारे या योजनेचा लाभ दिला जाईल.

Advertisement

किती जण उतरवू शकतात पॉलिसी –

या पॉलिसीत कुटुंबातील केवळ एका सदस्याला कवर मिळेल. विमाधारकाचे वय 18-59 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Advertisement

फक्त 100 रुपये प्रीमियम –

LIC च्या या आम आदमी विमा योजनेसाठी 30 हजार रुपयांच्या विम्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे प्रीमियम प्रति वर्ष 200 रुपये घेतले जाते. यापैकी सरकार 100 रुपये जमा करते आणि विमाधारकास 100 रुपये जमा करावे लागतात.

Advertisement

अन्य इतर व्यावसायिक गटाच्या बाबतीत, उर्वरित 50 टक्के प्रीमियम नोडल एजन्सी/सदस्य/राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून पुरवले जातात. LIC कडून चालवली जाणारी ही योजना सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे, असे सरकारकडून सांगितले जाते.

एलआयसीच्या या योजनेविषयी आपल्या शहरातील, आपल्या जवळील एलआयसी एजंटशी भेटून अधिक माहिती घ्या, मगच या योजनेत गुंतवणूक करा.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/FollowSpreadit

Advertisement