SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कांदा घसरलाच नाही तर आपटला, बाराच्या भावात विक्री!

कांद्याचे उत्पादन घेणारा शेतकरी मालामाल होणार असे साधारणतः प्रत्येकाचे विचार असतात. हीच मानसिकता घेऊन प्रत्येक शेतकरी कांद्याची लागवड करतो. मागच्या वर्षीपर्यंत अगदी कांद्याला 10 हजार इतका भाव मिळत असताना, आत्ताचा कांद्याचा नीचांकी दर अक्षरशः 1500 वर येऊन ठेपला आहे.

दिवाळीपर्यंत कांद्याचा भाव क्विंटल दर 10 हजार इतका होता. हाच भाव असा वाढत राहील ही आशा ठेवून महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. वातावरणातील बदलाने आणि पावसाच्या चांगल्या जोरामुळे भारतातील इतर राज्यात शेतकऱ्यांनी देखील कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.

Advertisement

यामुळे, आपसूकच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर घसरला 3000-3500 भाव मिळत असताना आता हा तर 1500 रुपयांवर येऊन ठेपला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

बाहेर देशातून कांद्याला असणारी मागणी महाराष्ट्रातील कांद्याला कमी झाल्याने आणि उत्पादन जास्त झाले असल्याने हे दर घसरल्याचे तज्ञ सांगतात.

Advertisement

हे असे असले तरी देखील, वर्षभराची मेहनत घेऊन शेतकरी जेव्हा पीक पिकवतो तेव्हा त्यातून मिळणारा मोबदला त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.

उत्पादन जास्त प्रमाणात झाले आणि भाव कमी मिळत असेल तरी देखील खर्च झालेला आणि लागवडीसाठी लागलेला पैसा हा आधीच हातातून गेलेला असतो. त्यात मागणी जरी वाढली असली तरी, कचऱ्याच्या भावाने सोनं विकणे शेतकऱ्यांना किती परवडणारे आहे? हादेखील विचार करायचा मुद्दा आहे.

Advertisement

कांदा हे पीक असे आहे की, याची लागवड ही खरच महाग असते तसेच, मिळालेले उत्पादन हे शेतकरी जास्त दिवस स्वतःजवळ ठेवू शकत नाही. कांदा सडणे किंवा खराब होण्याचे प्रमाण देखील खूप मोठे असते. ओला कांदा असेल तर, त्याचे नुकसान जास्त प्रमाणात होते. वाळलेला कांदा काही दिवस जास्त टिकून राहू शकतो. मात्र, तरीही जवळ उत्पादन ठेवून हातात पैसा नसताना स्वतःचा उदरनिर्वाह करणे देखील शेतकऱ्यांना अशात जड होते.

इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com

Advertisement

आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in

Advertisement