SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या या सवयी तुम्हाला बरबाद करतील, आजच व्हा सावध!

प्रत्येक व्यक्तीला घडवण्याचं आणि बिघडवण्याचं काम हे त्याच्या सवयी करत असतात. आपण पाच वर्षानंतर कुठं असू शकतो किंवा आपण यशस्वी होऊ की अयशस्वी हे तुमच्या आजच्या सवयी सांगू शकतात. इतकेच काय तर आपण दीर्घायुषी होऊ की, अल्पायुषी हे सुद्धा तुमच्या सवयीवरच अवलंबुन आहे.

चला तर मग जाणून घेऊयात की, कोणत्या सवयी तुम्हाला बरबाद करू शकतात!

Advertisement

1. निष्काळजीपणा किंवा बेफिकिरी
त्याला काय होत? बघू पुढच्या पुढं? आपण नाही घाबरत! असे फालतू डायलॉग मारण्याची सवय बऱ्याच जणांना असते. परंतु हा निष्काळजीपणा किंवा हीच बेफिकिरी तुमच्या आयुष्यात तुमचा घात करू शकते. जसे कि हेल्मेट वापरणे हि एक चांगली सवय आहे. परंतु, आपण निष्काळजीपणे हेल्मेट वापरणे टाळतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यासाठी किंवा आरोग्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्यात निष्काळजीपणा अजिबात करू नका.

2. व्यसन करण्याची सवय
आज समाजात किंवा अवतीभोवती तुम्ही पाहात असाल कित्येक लोक व्यसनी आहेत. आणि या व्यसनामुळे ते स्वतःच्या आयुष्यासोबत तर खेळतातच परंतु, यामुळे कुटुंबालाही या गोष्टींची हानी पोहोचते. जसे की, धूम्रपानाची सवय असल्यास घरातील इतरांनाही श्वसनाचे रोग होण्याची शक्यता वाढते.

Advertisement

व्यसनामुळे आर्थिक तसेच शारीरिक दुर्बलता वाढते आणि आयुष्यात आपण जे ध्येय ठेवलेले आहेत ते प्राप्त करणे कठीण होऊ शकते. अनेकदा नशेच्या आहारी आपण चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होऊन हानी होऊ शकते त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि कुठल्याही व्यसनापासून स्वतःला दूर ठेवा. लक्षात ठेवा व्यसन म्हणजे व्यसनाला आमंत्रण!

3. खोटं बोलण्याची सवय
अनेकदा आपण छोट्या छोट्या तसेच मोठ्या गोष्टीत खोटं बोलतो. खोटे बोलण्याची सवय इतकी वाढते की, आपण आपल्याच नकळत खोटे कधी बोललो हे समजत पण नाही. जसे कि कुणी विचारलं की, ‘यायला किती वेळ लागेल?’ तर आपण सहज बोलून जातो ‘आलोच 2 मिनटात!’ आणि आपल्याला वेळ लागतो 10 मिनिटे.

Advertisement

खोटं बोलण्याच्या सवयीमूळे लोक आपल्यावर विश्वास ठेवताना कचरतात. ‘थापाड्या’ म्ह्णून आपली समाजात ओळख निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो आणि लोक आपल्याला टाळायला लागतात. त्यामुळे जर तुम्हाला खोटं बोलण्याची सवय असेल तर हि सवय लगेच बदला.

4. वेळेवर न जेवण्याची सवय
आज प्रत्येकाचंच जीवन फार धावपळीचं झालं आहे. त्यामुळे जेवण किंवा नाश्ता वेळेवर न करणं हि एक सवय झाली आहे. आपल्या पचनशक्तीची एक सायकल असते आणि भुकेच्या वेळी जेवलेच पाहिजे. पंरतु आपण वेळच्या वेळी न जेवता बरेच जण जेवण टाळतात, ज्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

Advertisement

वेळेवर न जेवल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह सारख्या रोगांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता कधीच टाळू नका किंवा जेवणाच्या वेळा निश्चित करून त्याच वेळेस जेवण करा.

5. टाईमपास करणे
आयुष्यात सगळ्यात मौल्यवान काय आहे तर वेळ! परंतु आपण वेळेला किंमत देत नाही आणि आपला वेळ कुठेही कसाही खर्च करतो. जसे की, सोशल मीडियावर टाईमपास करणे, टीव्ही पाहत बसने किंवा कारण नसताना तासंतास मोबाईलवर बोलत बसणे. तसेच मित्र-मैत्रिणींचे ग्रुप बनवून उगाचच गॉसिपिंग करणे.

Advertisement

त्यामुळे, जर आपण आपला वेळ आपले आयुष्य समृद्ध करण्यासाठी किंवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी जर खर्ची नाही केला तर आपण अपयशी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमचा प्रत्येक मिनिट योग्य कारणासाठी खर्च होईल असे लक्ष द्या.

6. उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे
आजकाल तर जवळपास प्रत्येकाचीच लाईफस्टाईल बदलली आहे. प्रत्येकच जण उशिरा झोपतो आणि उशिराच उठतो. परंतु निसर्गाने आपल्या जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा निश्चित केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट त्याच त्या वेळेत व्हायला हवी. नाहीतर पूर्ण सायकल चेंज होते. त्यामुळे योग्य वेळेतच झोप आणि योग्य वेळेतच उठा. शरीराला पुरेशी झोप आवश्यक आहे. जास्त पण नको आणि कमी पण नको.

Advertisement

चला तर मग तुम्हालाही वरील एखादी वाईट सवय असेल तर ती सवय लगेच सोडा आणि स्वस्थ, समृद्ध आयुष्य जगा. कारण आयुष्य एकदाच आहे परंतु आपल्या एखाद्या चुकीच्या सवयीमुळे सुंदर आयुष्याला बरबाद होऊ देऊ नका.

लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रणीनींना नक्की पाठवा. तुम्ही पालक असाल तर हा लेख तुमच्या पाल्यांना नक्की पाठवा.

Advertisement

इतर बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : www.spreaditnews.com

आता WhatsApp वर ताज्या बातम्या आणि माहिती-मनोरंजन मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून ‘स्प्रेडइट’ जॉईन करा : www.spreadit.in

Advertisement