SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईलवरूनही रेशन कार्ड काढता येणार, तुम्ही फक्त एवढंच करायचं..

आपल्या देशात ज्याला कायदा कळतो, त्याच्यासाठी सर्व काही सहज आणि सोपं असतं. गरिबांसाठी कोणत्याच सुविधा नसतात. भल्याही त्या खास त्याच्यासाठी असल्या तरी. जिकडे तिकडे एजंटांचा सुळसुळाट आहे. परंतु सरकार हल्ली प्रत्येक गोष्टीत पारदर्शीपणा आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

गरिबांना धान्य मिळालं पाहिजे, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने वन नेशन वन राशन कार्ड या मोहिमेंतर्गत मेरा रेशन ॲप लाँच केला आहे.

Advertisement

तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तरी तुमच्या किंवा दुसऱ्यांच्या स्मार्ट फोनद्वारे अर्ज करता येईल. तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे, जेथे आपण राहतो, त्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं नाव टाकायचं आहे.

तुम्ही जर 18 वर्षांचे झाला असाल तर कार्डसाठी अर्ज करता येईल. त्यापेक्षा कमी वय असेल तर पालकांच्या रेशनमध्ये समाविष्ट होता.

Advertisement

आता तुम्ही काय करायचं..?

▪️ सर्वात आधी http://mahafood.gov.in/website/marathi/Download.aspx या वेबसाईटवरवर जाऊन फॉर्म डाउनलोड करू शकता. तो डाऊनलोड झाल्यावर ऑनलाईन रेशन कार्डसाठी ॲप्लाय करू शकता.

Advertisement

▪️ कोणताही अर्ज करता तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो. तो इथेही आवश्यक आहे. या अर्जासाठी काही ठराविक फी आहे. ती भरल्यास आणि अर्ज सबमिट करा.

▪️ अर्जासाठी 5 ते 45 रूपये शुल्क आहे. सबमिट केल्यानंतर आपला अर्ज यंत्राद्वारेच पडताळणी केला जाईल, योग्य असल्यास लगेच आपले रेशन कार्ड बनिवण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल.

Advertisement

▪️ आधार कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, लायसन, पासपोर्ट फोटो, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, वीज कनेक्शन बुक, बँकेचे पुस्तक ही कागदपत्रे जोडावी लागतात. अशा रितीने तुम्ही रेशन कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement