प्रवासात टोलनाक्याची व्यवस्था आणि होणारा त्रास हा सर्वश्रुत आहे. प्रवास लांबतो तो केवळ रहदारीने आणि टोल नाक्यांमुळे! आता देशभरातून टोल नाके हटवले जाणार आहेत.
केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत बुधवारी मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षभरात सर्व टोलनाके हटणार असल्याचं म्हणत त्यांनी जीपीएस सिस्टीम द्वारे टोल कसा वसूल होणार हे देखील सांगितले. अशी यंत्रणा आता वर्षभरात तयार होणार आहे.
टोलनाके हटणार म्हणजे टोल द्यावा लागणार नाही असे होत नाही. टोलनाके फक्त हटणार आहेत. परंतु, कंपनीला अशाने आपल्याला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील असेही ते म्हणाले.
कसा होणार टोल वसूल?
टोल वसूल होणार मात्र, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन त्यातही बदल होणार आहे. जेव्हा महामार्गावर गाडी जाणार तेव्हा जीपीएस द्वारे ड्रायव्हरचा एक फोटो काढला जाणार, आणि महामार्गावरून जाताना सुद्धा एक फोटो काढला जाणार!
जेवढा मार्ग तुम्ही वापरला तेवढा टोल तुम्हाला भरावा लागणार आहे. मात्र, याने अतिरिक्त टोल बंद होऊन टोलनाक्याची अडचण सुद्धा महामार्गावरील प्रवासात दूर होणार आहे. येत्या वर्षात देशातील सर्व टोलनाके आता हटवण्याची योजना केंद्र सरकार करणार आहे.
[ 📲 ताज्या बातम्या आणि जॉब अपडेट्स मिळवा WhatsApp वर 🆓 👉 https://cutt.ly/joinspreadit ]