SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

😨 बुलढाणा: रुग्णवाहिकेने 5 जणांना चिरडले

▪️ रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या पाच जणांना चिरडले, पती-पत्नी ठार, 3 जखमी; या अपघातात पती-पत्नी ठार झाल्यामुळे त्यांचे 4 वर्षीय बालक झाले पोरके, शहरातील त्रिसरण चौकातील घटना

Advertisement

🔥 देशात गाजलेलं अँटिलिया स्फोटके प्रकरण

▪️ NIA ने सचिन वाझेंच्या घरातून अनेक कागदपत्रे केली जप्त, क्राइम सीन केला रिक्रिएट; मुंबई पोलिसांच्या अजुन दोन अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता; NIA ला हे जाणून घ्यायचे आहे की, कुणाच्या सांगण्यावरुन वाझेंना स्कॉर्पिओ प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली ?

Advertisement

😱 धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा राजकारणात करणार एंट्री

▪️ धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा राजकारणात टाकणार पाऊल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची घेतली भेट म्हणाल्या, “मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे.”

Advertisement

💣 पश्चिम बंगालमध्ये 15 ठिकाणी बॉम्ब हल्ला

▪️ भाजप खासदार अर्जुन सिंहांच्या घरी आणि ऑफिस ‘मजदूर भवन’जवळ 15 ठिकाणी बॉम्ब फेकले, 3 जण जखमी; BJP ने TMC वर केला आरोप, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

Advertisement

🛣️ टोलवसुली: मुंबई हायकोर्टाचे कॅगला निर्देश

▪️ मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सुरू असलेल्या टोलवसुलीविषयी जे काही आरोप आहेत त्यांचा विचार करून सखोल चौकशी करा आणि तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर आपले म्हणणे मांडा; मुंबई हायकोर्टाचे कॅगला निर्देश

Advertisement

✌️ पेटमध्ये सव्वाचार हजार विद्यार्थी उत्तीर्ण

▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेतलेल्या ‘पेट’ परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये सरासरी 67.35 टक्के विद्यार्थी पात्र; पेटसह नेट, सेट आणि एम.फिल. झालेल्या विद्यार्थ्यांची सोमवारपासून (ता.22) ऑनलाईन नोंदणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांची माहीती

Advertisement

👍 या विविध घडामोडी नक्की स्प्रेड करा!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement