SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरबसल्या सुरू करा हे फायदेशीर बिजनेस!

लॉक डाऊन मुळे नोकरी, बिजनेस वर गदा आलेली असताना अनेकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. अशा काळामध्ये घर बसल्या कोणता बिझनेस करता येईल हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे! या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर घरी बसून व्यवस्थित कमाई करण्याची संधी प्रत्येकाला मिळेल. हाच हेतू ठेवून आजच्या या लेखामध्ये आपण काही असे उद्योग पाहणार आहोत, जे घर बसल्या करून तुम्ही पैसे कमवू शकता.

फ्रिलांस रायटिंग

Advertisement

ज्यांना लेखनाची आवड आहे, असे लोक फ्रीलान्स रायटिंग करून पैसे कमवू शकतात. फ्रीलान्स रायटिंग करताना तुम्ही एखाद्या कंपनीसाठी किंवा एखाद्या उद्योगासाठी लेख, जाहिराती, अनुवाद, भाषांतर अशा पद्धतीने लेखकाची भूमिका निभावू शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता.

ब्रेड बनवणे

Advertisement

कोरोना च्या काळामध्ये बाहेरचे अन्न खाणे तसेच वर्ज झाले आहे. त्यामुळे अनेक जणांनी लोकांमध्ये ब्रेड देखील खाल्लेला नाही. ब्रेड बनवणे ही प्रक्रिया अवघड वाटत असली तरी ती घरी देखील होऊ शकते. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घरात ब्रेड बनवून बाहेर विकू शकता आणि त्याद्वारे कमाई करू शकता.

युट्युब चॅनेल सुरू करणे

Advertisement

यूट्यूब चैनल वर विविध प्रकारे कन्टेन्ट टाकून अनेक जण लाख रुपये कमावतात. याची योग्य ती लक्षात आली तर, विविध प्रकारे उपयुक्त माहिती यूट्यूब चैनल वर टाकून ते यूट्यूब चैनल व्यवस्थित प्रमोट करून देखील अनेक कंटेंट क्रियेटर पैसे सध्या कमवत आहेत. या साधनाचा विचार करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकता.

ब्लॉग मधून कमाई

Advertisement

लेखक म्हणून विविध विषयांवर लिहायची आवड असेल तर, एखादा विषय निवडून त्यावर ब्लॉग लिहिण्याची सवय तुम्हाला पैसे कमवून देऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्याला पाककला कुशल आपण आहोत असे वाटत असेल तर त्याविषयीचे ब्लॉग लिहून तुम्ही पैसे कमवू शकता यामध्ये येणाऱ्या विविध जाहिराती किंवा तुमच्या ब्लॉगचे डिजिटल मार्केटिंग करून लाखो रुपये तुम्ही कमवू शकता.

ऑनलाईन क्लास

Advertisement

जी कला तुम्हाला अवगत आहे ती इतरांनाही यावी आणि त्यातून कमाई ही बाब अशी तुमची इच्छा असेल तर, ऑनलाईन क्लास ही गोष्ट तुमच्या साठी उपयुक्त आहे. ऑनलाईन क्लास कोणत्याही गोष्टीचा घेऊ शकता. डान्स, कुकिंग, किंवा इतरही!

Advertisement