SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घाईने जेवताय? मग तुमच्या आरोग्यावर होतील हे दुष्परिणाम!

स्प्रेडइट - डिजिटल न्यूजपेपर

आपल्या शास्त्रात जेवयाचं कसं आणि झोपायचं कसं, हे सर्व शिकवलं आहे. परंतु ते वाचायला किंवा आपल्याला कुठं एवढा वेळ आहे. काम, काम आणि काम. प्रत्येकजणच शेड्युल्ड बिझी आहे. त्याला जेवायलाही वेळ नसतो. फटाफट नाष्टा आणि झडपट जेवण असंच चाललेलं असतं. परंतु जेवायलाच वेळ नसेल तर कमवायचं कशासाठी हाही प्रश्न उरतोच.

तुम्हाला हे माहितीय का, की नीट शांतपणे आणि चावून जेवण न केल्याने आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण असतं. तुम्हीही जर हाच प्रकार करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. आपल्याकडं म्हटलं जातं की एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे वगैरे. पण तसं कोणी करीत नाही. नीट खाल्लं नाही तर आपल्या शरीरावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.

Advertisement

पचन प्रक्रियेमध्ये गडबड निर्माण होतात. ही समस्या पुढे जाऊन मोठं गंभीर रुप धारण करते. गडबडीमध्ये जेवण उरकण्याने आपले हार्मोन्स बाधित होतात. भूक किती आहे हे समजून घेण्यामध्ये आपलं शरीर कमकुवत होऊ शकतं. त्यामुळे आपण आवश्यकतेपेक्षा अधिक अन्नाचे सेवन करु लागतो.

मधुमेहाला आमंत्रण
लवकर लवकर गडबडीत भोजन उरकण्याने इंश्यूलिन प्रतिरोधामध्ये वाढ होते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना डायबेटीज नसतो त्यांनी जर लवकर लवकर जेवण उरकलं तर त्यांच्यामध्ये डायबेटीजचा धोका अधिक असतो. त्यामुळेच जेवण करताना ते शांतपणे आणि गडबड न करता खावं.

Advertisement

पचन प्रक्रियेत गडबड
अपचन, पोटदुखी, पोटात जळजळ अशा समस्यांनी त्रासू शकता. यामुळे पचन प्रक्रियेत गडबड तर होतेच शिवाय पोटाच्या इतर व्याधी सुद्धा आपल्याला होऊ शकतात. सावकाशपणे अन्न सेवन करण्यास सुरवात करा. तशी सवय स्वत:ला लावून घ्या. तसं केल्याने मेटाबॉलिझम दरामध्ये वाढ होते, त्यामुळे आपली पचन प्रक्रिया अत्यंत सुस्थितीत राहते.

छातीत जळजळ
लवकर लवकर अन्न सेवन केल्याने हार्ट बर्न अर्थात छातीत जळजळीसारखी समस्या उद्भवू शकते. तुम्ही या समस्येला छोटी समस्या म्हणून दुर्लक्ष करता. मात्र, आपल्याला हे माहिती हवं की, ही समस्या पुढे जाऊन मोठं रौद्ररुप धारण करु शकते.

Advertisement

थेट मृत्यूला निमंत्रण
अनेकदा खाद्य पदार्थ श्वास नलिकेमध्ये अडकू शकतात. आपलं हे छोटसं बेजबाबदार वर्तन अगदी लवकर मृत्यूस देखील कारण बनू शकतं. व्यवस्थित सावकाशपणे, शांतपणेच अन्नाचे सेवन करा.

(ही माहिती वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Advertisement

📣 ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजना WhatsApp वर मिळवण्यासाठी ‘स्प्रेडइट’ला नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement