SpreadIt News | Digital Newspaper

ब्रेकिंग: 10वी व 12वी ला 25 टक्के गुण असले तरीही तुम्ही पास होणार? सरकार गांभीर्याने करतंय विचार…

राज्य परीक्षा नियोजन समितीने दहावी (10th) आणि बारावीच्या (12th) विद्यार्थ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. आता शासनाने दहावी-बारावी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करण्याचा विचार करणं सुरू केलं आहे.

राज्य परीक्षा नियोजन समिती दहावी-बारावीच्या उत्तीर्णतेचा निकष 35 टक्क्यांऐवजी 25 टक्के करण्याच्या हालचाली सुरू आहे. राज्य परीक्षा नियोजन समिती यावर गांभीर्याने विचार करत आहे.

Advertisement

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव पाहता 2020-21 या सत्रात फारच कमी कालावधीसाठी शाळांचे वर्ग भरले. आता 23 एप्रिल ते 21 मे बारावीच्या व 29 एप्रिल ते 20 मे दहावीच्या परीक्षा घेण्याचे ठरल्यानंतर परीक्षेचे नियोजन व त्याबाबतचे स्वरूप ठरवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा नियोजन समितीची स्थापना केली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे 2020-21 या वर्षात कमी कालावधीसाठी शाळेचे वर्ग भरले होते आता पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे, त्यामुळे जसजशी परिस्थिती आटोक्यात येईल तसतसा परीक्षा ऑफलाईन घेण्याकडे स्थानिक प्रशासन लक्ष घालू शकते, असे याआधीच सरकारने सांगितलं आहे.

Advertisement

यासोबतच दहावी व बारावीचा निकाल लावण्यासाठी परीक्षक व नियमक एकाच तालुक्यातील असले तर सोयीचे ठरेल आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बाह्य परीक्षक एकाच शाळेतील नेमण्याची सूचना मुख्याध्यापक संघाने केली आहे.

शाळांच्या वर्गातून अर्थातच ऑफलाईन शिक्षण न झाल्याने अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षण चालू असले तरीही 30 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्यच नाही, म्हणून सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचे ठरवले आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement