SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ बुधवार, 17 मार्च 2021

मेष : जवळचा प्रवास गरजेचा असेल तरच करावा. नवीन मित्र जोडले जातील. काही क्षणिक आनंदाच्या गोष्टी घडतील. ओळखीतून कामे पार पडतील. दिवस आळसात जाईल.

Advertisement

वृषभ : ऐषोरामाच्या वस्तू खरेदी कराल. मानसिक समाधान शोधाल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. कामात स्त्रियांची उत्तम साथ लाभेल. मित्रमंडळी जमवाल.

मिथुन : जोडीदाराशी मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्याल. कलेला विशेष प्राविण्य मिळेल. कामाची चोख पावती मिळेल.

Advertisement

कर्क : दिवस चांगल्या संगतीत जाईल. वडिलधार्‍यांची उत्तम मदत मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात. नातेवाईकांच्या समस्या जाणून घ्याल.

सिंह : खेळात मन रमून जाईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. विरोधकांच्या कारवाया मावळतील. कामाचे समाधान लाभेल.

Advertisement

कन्या : पत्नीची उत्तम साथ लाभेल. भागीदारीत चांगला लाभ होईल. तुमच्या संपर्कातील लोकात वाढ होईल. मुलांशी क्षुल्लक कारणावरून वाद संभवतो. पत्नीचे लाडीक हट्ट पुरवाल.

तूळ : भावंडांशी मतभेद संभवतात. हातात नवीन अधिकार येतील. कामातील ऊर्जा वाढेल. घरात नातेवाईक गोळा होतील. मानसिक स्वास्थ जपावे लागेल.

Advertisement

वृश्चिक : काही किरकोळ कौटुंबिक प्रश्न सोडवावे लागतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केंन्द्रीत करा. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. आप्तेष्टांशी मतभेद संभवतात.

धनू : दिवस धावपळीचा राहील. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद संभवतात. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

Advertisement

मकर : मनातील निराशा दूर सारावी. कुटुंबात काही बदल घडून येतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आर्थिक ताण वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे.

कुंभ : कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण जाणवेल. कौटुंबिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. आवडते पदार्थ खायला मिळतील. इतरांवर आपली उत्तम छाप पडाल.

Advertisement

मीन : हौस पूर्ण कराल. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. सर्वांशी गोडीने वागाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.

Advertisement