SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या

10 वी, 12 वीच्या प्रश्नसंचामध्ये चुका; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

▪️ इयत्ता 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत. मात्र यामध्ये काही प्रश्न एकापेक्षा जास्त वेळा प्रसिद्ध करण्यात आलेत, तर वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही प्रश्न देण्यात आले आहेत.

Advertisement

▪️ यावरून पालक आणि विद्यार्थी नाराज असून सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त होत आहे. पहिल्या टप्प्यात 12 वीच्या 7 आणि 10वी च्या 6 विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. तर काही दिवसांत सर्व विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत. यामुळे हे प्रश्नसंच अभ्यासपूर्णरित्या तयार झाले नाहीत, अशी टीका आता होत आहे.

भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू

Advertisement

▪️ फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; मृत्यूचे कारण अस्पष्ट, रामस्वरुप शर्मा हे दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये सध्या वास्तव्यास होते.

▪️ दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजेदरम्यान या घटनेची पहिल्यांदा सूचना मिळाली. अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शर्मा यांचा मृतदेह फाशीला लोंबकळलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

अभिनेता सोनू सूद तुम्हाला मिळवून देणार नोकरी..

▪️ गूडवर्कर ॲप हे एक नोकरी (Job) मिळवण्यासाठी मदत करणारे ॲप्लिकेशन आहे. सोनू सूदनं पुढाकार घेऊन हे ॲप दाखल केलं आहे. हे ॲप अत्यंत सुरक्षित असून, त्यात कोणतीही फसवणूक होणार नसल्याचा केला दावा.

Advertisement

▪️ कुठे आणि कसा करायचा अर्ज जाणून घेण्यासाठी गुडवर्कर ॲप इंस्टॉल करा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.pravasirojgar.app

देशात 4.12 लाख कोट्यधीश; 6.33 लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे वाढली

Advertisement

▪️ मुंबई सर्वात श्रीमंत शहर, 17 हजार काेट्यधीश, हुरुन इंडियाच्या वेल्थ रिपोर्टमध्ये नव्या मध्यमवर्गीय कुटुंबांची वार्षिक सरासरी बचत 20 लाख रुपये

▪️ राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल, यूपी दुसऱ्या, तामिळनाडू तिसऱ्या स्थानी

Advertisement

▪️ रिअल इस्टेट आणि शेअर बाजार गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले साधन

फंडांकडून फेब्रुवारीत टाटा मोटर्सची सर्वात जास्त शेअर खरेदी, ब्रिटानियाची विक्रीच

Advertisement

▪️ निफ्टीच्या 46 टक्के शेअर्समध्ये झाली खरेदी, एएमसी-एनएसई मिळून 3 वर्षांत करणार 50,000 नवीन एमएफ वितरक

▪️ सर्वात जास्त खरेदी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये राहिली. म्युच्युअल फंड्स कंपन्यांनी फेब्रुवारीत टाटा मोटर्समध्ये 13.3 टक्के हिस्सेदारी वाढवली; म्युच्युअल फंड्सने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये सर्वात जास्त 12.2 टक्के विक्री केली.

Advertisement

अमेरिकेतील 2 मसाज पार्लरमध्ये अंदाधूंद गोळीबार

▪️ अमेरिकेतील अ‍ॅटलांटा शहर आणि उपनगरातील हिंसाचाराची घटना घडली. 2 मसाज पार्लरमध्ये अंदाधूंद गोळीबार करण्यात आला.

Advertisement

▪️ मंगळवारी झालेल्या या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आशियाई वंशाच्या महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर. पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर त्याला दक्षिण पश्चिम जॉर्जिया भागातून अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement