SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

म्हणून सचिन वाझेंनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा रचला कट

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कटच होता. हे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)केलेल्या तपासात पुढे आले आहे. त्यांच्याकडून पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे. चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विधिमंडळात धारेवर धरले होते. त्यामुळे तपासाला गती आली आहे. एटीएस तपास करीत नसल्याने एनआयएने तपास हाती घेतला आहे. त्यात वाजेने कबुली दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. या प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी ठेवली. त्यानंतर या प्रकरणाचा यशस्वीपणे माग काढल्याचे श्रेय त्यांना मिळवायचे होते. या प्रकरणामुळे ख्वाजा युनूस प्रकरणात गेलेली पत मिळवायची होती. मात्र, एनआयए वाझे यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.

Advertisement

ख्वाजा प्रकरण काय आहे?
घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणात मूळ परभणीचा असलेल्या ख्वाजा युनूसचे नाव पुढे आले. तो दुबई येथे इंजिनिअर होता. अधिक तपासासाठी युनूसची चौकशी करण्यासाठी त्याला औरंगाबादला नेत असताना पारनेर येथील जातेगाव घाटात पोलिसांची गाडी उलटली. त्यात पोलिस जखमी झाले. अपघाताचा फायदा घेऊन वाजे पळून गेला, असे त्या पथकाचे म्हणणे होते. खरे तर ख्वाजाला पोलिस कोठडीत मारहाण करीत असताना त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर तो पळून गेल्याचा बनाव करण्यात आला, असे ख्वाजाच्या आई-वडिलांचे म्हणणं होतं.

सीआयडीने वाझेसह इतर कर्मचाऱ्यांना दोषी धरून निलंबित केलं. या प्रकरणात वाझे यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. मात्र, तपास सुरु असल्याने तो मंजूर केला नाही.

Advertisement

दरम्यान, 2018 नंतर या प्रकरणावर कोर्टात कोणतीही सुनावणी झाली नाही. निलंबनाच्या काळात वाझे शिवसेनेत गेले. आता या वर्षी कोरोनाकाळात ते पुन्हा पोलिस दलात आले. त्यांनी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. या प्रकरणाला तीही बगल देण्याचा प्रयत्न झाला.

फडणवीस म्हणाले, वाझेचे बॉस सरकारमध्ये बसलेत
वाझे प्रकरणात फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वाझेनेच हा कट रचला आहे. तो सरकारचा वसुली अधिकारी म्हणून काम करीत होता. मी गृहमंत्री असताना त्याला शिवसेनेने वाझेला परत घेण्यासाठी हट्ट धरला होता. परंतु मी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्याला परत पोलिसांत घेतले नाही. परमबीर सिंग आणि वाझे या प्रकरणातील फार छोटी कडी आहे. त्याला सरकारमधील लोकं अॉपरेट करीत आहेत. त्यांचा शोध घेतला पाहिजे.

Advertisement

📣 आता ब्रेकिंग न्यूज मिळवा WhatsApp वर, त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/joinspreadit

Advertisement