SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, पॉवर टिलर ते ट्रॅक्टरपर्यंत मिळणार सगळं काही, अर्ज ‘असा’ करा..

शेती ही भारताची ओळख आहे. त्यामुळे भारत सरकारने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकणाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे, जेणेकरून पारंपारिक औजारांचा वापर कमी करून यंत्रांच्या साहाय्याने शेती करण्यास सोपी होईल व वेळेची बचत होईल.

शेती करताना विविध समस्या येतात. जसे की शेतीमधील मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नाही आणि मिळालं तरी ती बाब खर्चिक बनते. म्हणून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं महत्वाचं वाटत आहे. यासाठी सरकार यंत्र व अवजारांसाठी अनुदान देत आहे.

Advertisement

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच यांसारख्या औजारांसाठी अनुदान देत आहे.

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानासाठी अर्ज कुठे करायचा ?

Advertisement

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. यात लॉटरी पद्धतीनं शेतकऱ्यांची निवड केली जाते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येते.

योजनेचा उद्देश –

Advertisement

▪️ कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेअतंर्गत ज्या शेतीमध्ये उर्जेचा वापर कमी आहे, अशा शेती क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.

▪️ प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

Advertisement

▪️ कृषि यंत्र/ अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे, हा उद्देश आहे.

लक्षात ठेवा..

Advertisement

▪️ शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकऱ्याकडे /12 उतारा व 8 अ चा उतारा असावा. शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.

▪️ या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एखादं अनुदान मिळालं तर पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही, पण इतर औजारासाठी तुम्ही अर्ज करू शकतात.

Advertisement

‘या’ औजारांचा लाभ मिळू मिळतो..

▪️ ट्रॅक्टर
▪️ पॉवर टिलर
▪️ ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
▪️ बैल चलित यंत्र/अवजारे
▪️ मनुष्य चलित यंत्र/अवजारे
▪️ प्रक्रिया संच
▪️ काढणी पश्चात तंत्रज्ञान
▪️ फलोत्पादन यंत्र/अवजारे
▪️ वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
▪️ स्वयंचलित यंत्रे

Advertisement

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे-

▪️ आधार कार्ड
▪️ ७/१२ उतारा
▪️ ८ अ दाखला
▪️ खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
▪️जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
▪️ स्वयं घोषणापत्र
▪️ पूर्वसंमती पत्र

Advertisement

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

▪️ कृषी यांत्रिकीकरण योजनेमार्फत ट्रॅक्टरचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वात आधी 👉 https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

▪️ पुढे शेतकरी योजनावर क्लिक करून पुढे कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना निवडा.

▪️ महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक करा.

Advertisement

▪️ यानंतर शेतकऱ्यांनी त्यांचं नाव टाकावे, युजर नेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटीवर लॉग इन बद्दलची माहीती तयार करा, त्यासाठी शेतकऱ्याकडे ईमेल आयडी असणं गरजेचं असून त्यांचं आणि मोबाईल नंबरचं व्हेरिफिकेशन करा.

▪️ लॉग इन करुन अर्ज भरावा लागेल. लॉग इन केल्यावर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करुन घ्या. शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती, शेती जमिनीची माहिती भरा.

Advertisement

▪️ शेतकऱ्यांनी लॉग इन करा व पुढील माहिती भरा. एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण पर्याय निवडून पुढे जा.

▪️ शेतकऱ्यांनी कृषी यंत्र औजारांच्या खरेदी करण्यासाठी अर्जसहाय्य हा पर्याय निवडावा. त्यानंतर जी औजारे हवीत त्यासंबंधी पर्याय निवडावा.

Advertisement

▪️ सर्व माहिती भरल्यानंतर ‘अर्ज सादर करा’ या बटनावर क्लिक करा. अर्ज सादर केल्यानंतर प्राधान्य क्रमांक निवडावा. त्यानंतर अर्जाची फी भरावी. यासाठी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/joinspreadit

Advertisement